Sharad Pawar On Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

NCP Crisis: अजित पवार यांच्या भूमिकेवर शरद पवार यांनी पहिल्यांदाच सोडलं मौन; म्हणाले...

Sharad Pawar On Ajit Pawar: अजित पवार यांच्या भूमिकेवर शरद पवार यांनी पहिल्यांदाच सोडलं मौन; म्हणाले...

Satish Kengar

Sharad Pawar On Ajit Pawar:

राष्ट्रवादी पक्षात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. अशातच पक्ष कोणाचा यासाठी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आलं आहे. आपल्या उत्तरात शरद पवार गटाने अजित पवारचे सर्व दावे फेटाळण्यात आले असून 9 मंत्र्यांसह 31 आमदारांंविरोधात अपात्रतेची याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

यातच पहिल्यांदाच शरद पवार यांनी अजित पवार यांच्या भूमिकेबद्दल आपलं मौन सोडलं आहे. ते म्हणाले आहेत की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. अजित पवार यांनी घातलेली भूमिका विरोधाभासी आहे. त्याच्या दाव्यांना कोणताही कायदेशीर अथवा भौतिक आधार नाही.

शरद पवार म्हणाले की, काही खोडकर आणि टवाळ व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचं त्यांनी निवडणूक आयोगासमोर म्हटलं आहे. निवडणूक आयोग आपले कर्तव्य निःपक्षपाती पणे पार पाडेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात दाखल केलेल्या या उत्तरात अजित पवार गटाने केलेले सगळे दावे फेटाळण्यात आले आहेत. तसेच सत्तेत सहभागी झालेल्या मंत्र्यांसह अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधात अपात्रतेची याचिकाही दाखल करण्यात आली आहे. नऊ मंत्र्यांशिवाय 31 आमदारांच्या विरोधातही अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

यातच आतापर्यंत एकूण आमदारांपैकी किती आमदार अजित पवार यांच्याकडे आणि किती शरद पवार यांच्याकडे हा आकडा स्पष्ट झालेला नव्हता तो आता अखेर समोर आला आहे. दोन्ही गटाकडून पक्षावर ताबा मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain Alert : राज्यातून गुलाबी थंडी गायब? ऐन हिवाळ्यात 'या' जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update: मनसे नेते अमित ठाकरे नेरुळमध्ये शिवस्मारकास अभिवादन करणार

Maharashtra Politics : मनसेसोबत आघाडीवरुन काँग्रेसमध्ये मतभेद; वडेट्टीवारांचं समर्थन, गायकवाडांचा विरोध, VIDEO

Maharashtra Politics : दादांची मतदारांवर दादागिरी? अजितदादांची 'अर्थ'पूर्ण दहशत? VIDEO

Maharashtra Politics: ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार? भाजपकडून शिंदेंची कोंडी?

SCROLL FOR NEXT