Nagpur: नागपूरच्या एम्समधील जेवणात आढळले किडे, किळसवाणा VIDEO समोर

Worms Found in Food at AIIMS Mess: नागपूरच्या प्रसिद्ध एम्स रुग्णालयातील मेसमधील जेवणामध्ये किडे आढळल्याचा संतपजनक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नागपुरामधील प्रतिष्ठित एम्स रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजे एम्समधील मेसच्या जेवणात किडे आणि सुरवंट आढळल्याने खळबळ उडाली. जेवणात किडे आढळून आल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांनी याचा व्हिडीओ तयार केला असून तो व्हायरल होत आहे. बुधवारी पदवीधर विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये किडे आणि सुरवंट आढळून आले. फळांच्या तुकड्यावर एक मृत किडा आढळला आणि भाजीमध्ये माशीसारखा पदार्थ आढळला. शिवाय मशरूम करीमध्ये एक स्पंजयुक्त पदार्थ आढळला. या किळसवाण्या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान एम्समध्ये मेसचा करार अलीकडेच बदलण्यात आलेला आहे. त्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून या घटना घडत आहेत का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com