PM Narendra Modi News, Dr Amol Kolhe News saam tv
मुंबई/पुणे

NCP Amol Kolhe Poem Viral : PM नरेंद्र मोदींचा पुणे दौरा अन् दुसरीकडे खासदार अमोल कोल्हेंची कविता व्हायरल

Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा आणि दुसरीकडे अमोल कोल्हेंची कविता समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चाणा उधाण आलं.

प्रविण वाकचौरे

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक पुरस्काराने त्यांना आज सन्मानित करण्यात आलं आहे. एकीकडे हा दिमाखदार सोहळा पार पडत असनाता व्यासपीठावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही होते. दुसरीकडे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली.

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? या लोकमान्य टिळकांच्या लेखाची आठवण यातून अमोल करुन देताना दिसत आहे. मात्र एकीकडे  पंतप्रधान मोदीचा दौरा आणि दुसरीकडे अमोल कोल्हेंची कविता समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चाणा उधाण आलं.

अमोल कोल्ह यांनी आपल्या कवितेत जातीय दंगे, महागाई, मणिपूर हिंसाचार अशा सर्व मुद्द्यांना हात घातला आहे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? याचं आत्मचिंतन प्रत्येक निर्णय घेताना व्हावं, असं अमोल कोल्हे यांनी आपल्या कवितेतून म्हटलं आहे. (Maharashtra News)

अमोल कोल्हेंची कविता

पगडी म्हणाली डोक्याला, माझ्या मालकांची ओळख आहे ना तुम्हाला

ते असंतोषाचे जनक, देशाला भरडणाऱ्या परकीय इंग्रजांविरुद्ध

तुमचे काय त्याच्यात देश भरडणाऱ्या महागाई विरुद्ध

गणेशोत्सवासारख्या धार्मिक कार्यक्रमानं त्यांनी बघता बघता देश जोडला

तोच देश जाती आणि धर्माच्या नावानं पेटवणाऱ्यांविषयी तुम्ही कधीच का नाही बोलतात

ते हसत हसत जाऊन आले मंडालेला

वाटतं तुम्हाला जावसं देशासाठी जवळच्या पेटत्या मणिपूरला

त्यांचं वक्तृत्व अमोघ, तसंत तुमचंही

ते होते लोकमान्य एका अर्थाने तुम्हीही

ते जहाल मतवादी तसेच जहाल तुम्हीही

ते गरजले होते, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?

याच शुभेच्छा ही पगडी घालताना

व्हावं आत्मचिंतन प्रत्येक निर्णय घेताना...

सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?

सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बीड जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

SCROLL FOR NEXT