Navi Mumbai Water Supply yandex
मुंबई/पुणे

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईत आज पाणी पुरवठा बंद, नागरिकांनो पाणी जपून वापरा

Navi Mumbai Water Supply: नवी मुंबईत जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन पालिकेकडून केले जात आहे.

Priya More

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. नवी मुंबईमध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे. १० तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्यामुळे नवी मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे. जलवाहिनीच्या दुरूस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महापालिकेचे भोकरपाडा जलशुद्धीकरण आणि मोरबे धरण ते दिघा जलवाहिनी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज १० तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. दुरिस्तीच्या कामामुळे आज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत नवी मुंबई शहरात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

आज नवी मुंबईत पाणी पुरवठा बंद राहिल तर उद्या म्हणजे शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नवी मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात येत आहे. नवी मुंबईतील सर्वच भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT