पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यामध्ये अघोषित पाणी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक भागातील पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून नागरिकांचे हाल होत आहे. काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. तर काही भागांमध्ये पाणी पुरवठा करण्याच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना याचा फटका बसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहराच्या विविध भागात पाणी पुरवठ्याची वेळ एक ते दीड तासाने कमी करण्यात आली आहे. पुणे महापालिकेकडून शहरात अनेक ठिकाणी पाणी पुरवठा करण्याच्या वेळमध्ये बदल करण्यात आला आहे. तर अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. पुण्यातील कर्वे नगर, एरंडवणे, गोखले नगर, विद्यापीठ परिसर, बिबवेवाडी आणि शिवाजी नगर या भागात अघोषित पाणी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिक संतप्त झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.