Maharashtra Weather : राज्यात उन्हाच्या झळा वाढणार, सव्वाशे वर्षानंतर पुणे पुन्हा तापणार; IMD चा अंदाज

Weather Update : मार्च महिन्यापासून उष्णतेच्या तीव्र लाटा येणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यांनी केरळ, तामिळनाडू यांच्यापेक्षाही महाराष्ट्रात सरासरीने अधिक तापमान असल्याचे अंदाजही वर्तवला आहे.
Weather Update
Weather UpdateSaam Tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

मागील काही दिवसांमध्ये राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. हवामान विभागाने महाराष्ट्रामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा येणार असल्याचा इशारा दिला आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील राज्यात ठिकठिकाणी प्रचंड उष्णता जाणवली होती. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत कमाल आणि किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २ अंश सेल्सियस अधिक असण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने पुण्यात तापमान तब्बल ३८ अंश सेल्सियसपर्यंत जाणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. देशाच्या बहुतांश भागात यंदाचा उन्हाळा अधिक उष्ण राहणार असल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मार्च महिन्यापासून उन्हाच्या तीव्र लाटा येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

१९०१ पासूनच्या नोदींनुसार, फेब्रुवारी महिन्यात किमान तापमानाचा पारा हा आतापर्यंत सर्वोच्च पातळीवर होता. महिन्यातील कमाल तापमान हे आतापर्यंतचे दुसरे सर्वोच्च ठरले होते. हवामान खात्याचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सव्वाशे वर्षांनंतर पुण्याचे हवामान सर्वाेच्च स्तरावर जाणार आहे. महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये केरळ, तामिळनाडूमध्ये तापमान कमी राहणार आहे.

Weather Update
Swargate Bus Deopt Case: शिवशाही अत्याचार प्रकरणात ट्विस्ट; पीडित तरुणीबाबत फलटण पोलिसांकडून मोठा खुलासा

मार्च ते मे महिन्यांमध्ये सर्वाधिक उन्हाच्या झळांचा सामना करावा लागू शकतो. इतर राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र अधिक उष्णता असू शकते. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे शासनाने म्हटले आहे. १२ ते ४ दरम्यान उन्हात जाणे टाळावे, पाणी जास्त पिणे, सुती कपडे वापरणे या गोष्टींचे पालन करावे.

Weather Update
Mumbai Metro: मुंबई मेट्रो-३ चा दुसरा टप्पा कसा असणार? किती आणि कोणती स्थानके? तिकीट किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com