Navi Mumbai Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, पोलिसांनी महिला अन् पुरूषाला नको 'त्या' अवस्थेत पकडलं

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी या स्पा सेंटरवर छापा टाकत दोघांना अटक केली. पोलिसांनी एका महिलेची सुटका केली. आरोपी गरजू महिलांचा गैरफायदा घ्यायचे.

Priya More

Summary:

  • नवी मुंबईत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

  • या प्रकरणी पोलिसांनी नवरा-बायकोला केली अटक

  • आरोपी गरजू महिलांचा गैरफायदा घ्यायचे

नवी मुंबई पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. नवी मुंबईतल्या कळंबोलीमध्ये ही कारवाई करण्यात आली. स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला. यावेळी महिला आणि पुरूषाला पोलिसांनी नको त्या अवस्थेत पकडलं. या प्रकरणी पोलिसांनी नवरा-बायकोला अटक केली.

स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसाय रॅकेटवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. रोडपाली येथील गोल्डन किंग स्पावर छापा टाकत उत्तराखंडमधील एका जोडप्याला पोलिसांनी अटक केली. कळंबोलीतील या स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे कळंबोलीत खळबळ उडाली आहे.

रोडपाली येथील गोल्डन किंग सलून अँड स्पावर पोलिसांनी छापा टाकला असता त्या ठिकाणी बॉडी मसाजच्या नावाखाली मुलींना वेश्याव्यवसायात ढकलले जात होते. पोलिसांनी या स्पाचा चालक समीर उर्फ ​​अन्सारी आणि त्याची बायको ​​सलमा अन्सारी या दोघांना अटक केली. यावेळी पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली.

पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी अटक केलेले आरोपी नवरा-बायको हे गरजू महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून हे काम करून घेत होते. दोघेही या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून उपजिविका करत होते. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून अजून कुणाचा सहभाग आहे की नाही याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT