.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
बिहारमध्ये ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार
सख्ख्या काकाने केलं भयंकर कृत्य
काकाने दोन मित्रांसह या मुलीवर केले बलात्कार
पोलिसांनी २ आरोपींना केली अटक
बिहारमध्ये ३ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना पाटणाच्या परसा बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. सख्ख्या काकाने आपल्या दोन मित्रांसोबत चिमुकलीवर आळीपाळीने बलात्कार केला. पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर सध्या पाटणाच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. एक आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. पीडित मुलगी घरामध्ये आईसोबत झोपली होती. आरोपी काकाने तिला घरातून उचलून नेले. घराजवळच्या शेतामध्ये त्याने तिला नेले. त्याठिकाणी आरोपीने आपल्या दोन मित्रांसह चिमुकलीवर बलात्कर केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडित मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी पीडित मुलीच्या काका आणि त्याच्या एका मित्राला अटक केली. एक आरोपी सध्या फरार आहे.
पीडित मुलीच्या आईने सांगितले की, मुलगी रात्री घरामध्ये झोपली होती. त्यावेळी तिचा नशेच्या आहारी गेलेला काका घरी आला. त्याने मुलीला उचलून नेले. घरापासून जवळपास ५०० मीटर अंतरावर असलेल्या शेतामध्ये तो मुलीला घेऊन गेला. त्यावेळी गावातील एक व्यक्ती आपल्या मच्छीपालन तलावावर राखण करत बसला होता. त्याने मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्यानंतर त्याने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. तेव्हा आरोपी पीडित मुलीला घटनास्थळी सोडून पळून गेले.
पीडित मुलीच्या आईला जेव्हा जाग आली तेव्हा मुलगी तिच्याजवळ नव्हती. ती जोरजोरात रडू लागली. त्यानंतर तिच्या घरातील सर्वजण जागे झाले. मुलीचा शोध घेतला असता ती शेतामध्ये त्यांना भेटली. मुलीची अवस्था पाहून ते प्रचंड घाबरले. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. दोघांना पोलिसांनी अटक केली. एक आरोपी फरार आहे पण त्याला लवकरात लवकर अटक करू असे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.