Navi Mumbai Tunnel Saam Tb
मुंबई/पुणे

Navi Mumbai Tunnel: नवी मुंबईचा कायापालट होणार, पाम बीचखालून जाणार भुयारी मार्ग; नेमका प्लान काय?

Navi Mumbai Palm Beach Tunnel: नवी मुंबईत आता एक नवीन भुयारी मार्ग तयार होणार आहे. सानपाडा येथील पाम बीचखालून हा भुयारी मार्ग असणार आहे. यामुळे मोराज सर्कलवरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

Siddhi Hande

नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी

पाम बीचखालून जाणार भुयारी मार्ग

मोराज सर्कलवरील वाहतूक कोंडी फुटणार

मुंबईनंतर आता नवी मुंबईकरांनाही भुयारी मार्गातून प्रवास करता येणार आहे. नवी मुंबईतील पाम बीचखालून जाणाऱ्या भुयारी मार्गाला मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. सानपाडा सेक्टर १९ येथील सॉलिटेअर इमारतीजवळील बीच मार्गाखालून हा भुयारी मार्ग जाणार आहे. यामुळे आता नवी मुंबईकरांचीही वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. (Navi Mumbai Tunnel)

नवी मुंबईत नवीन भुयारी मार्ग (Navi Mumbai Palm Beach Tunnel)

या भुयारी मार्गामुळे मोराज चौक येथील वाहतूक कोंडी फुटणार आहे. पाम बीच मार्गाखालील वाहनचिल भुयारीमार्ग हा सानपाडा ते जुईनगर असणार असणार आहे. हा नवी मुंबईकरांसाठी दिलासादायक प्रकल्प आहे.

सध्या सानपाडा नोडमध्ये जाण्यासाठी सानपाडा गाव आणि मोराज सर्कल हे दोनच ऑप्शन आहेत. सध्या पामबीचवरुन मोराजवरुन सानपाडा येथे जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या मोराज सर्कलवर प्रचंड वाहतूक कोंडी होती. ही वाहतूक कोंडी आता फुटरणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाची मंजुरी

पामबीच मार्गाखालून भुयारी मार्ग व्हावा, यासाठी माजी नगरसेविका वैजयंती भगत आणि रुपाली भगत यांनी पाठपुरावा केला. मात्र, त्यासाठी न्यायालयाची परवनागी अनिवार्य होते. या भुयारी मार्गामुळे कांदळवन तोडले जाणार नाही तसेच सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, असं स्पष्ट झालं. त्यानंतर या कामाला सुरुवात झाली.

हा मार्ग कसा असणार?

सानपाडा सेक्टर १९ केसर सॉलिटेअर इमारतीजवळील पामबीचखालून हा मार्ग जाणार आहे. या भुयारी मार्गामुळे सेक्टर १, १२ आणि १९ तसेच सानपाडा गाव आणि सेक्टर २, ११ येथे नागरिकांना कायमचा दिलासा मिळणार आहे. त्यांना सानपाड्यात जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: मोठी बातमी! यापुढे कर्जमाफीत रकमेची मर्यादा नाही, २५ लाख शेतकऱ्यांना होणार फायदा

विद्यार्थ्यांना गॅलरीत बसून शिक्षण घेण्याची वेळ, मुंबईतील हायस्कूलमधील धक्कादायक प्रकार; कारण काय?

DRDO Recruitment: डीआरडीओमध्ये नोकरीची संधी; ७६४ पदांसाठी भरती; पगार १,१२,४०० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी खुशखबर

EVM हॅकिंगसाठीच मतमोजणी लांबणीवर'; काँग्रेसचा भाजपवर मोठा आरोप

SCROLL FOR NEXT