

मुंबईतील वाहतूक कोंडी टळणार
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
७ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्ग प्रकल्पाचं काम सुरु
भारताची आर्थिक राजधानी मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम असल्याचं पाहायला मिळतंय. ही वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील ईस्टर्न फ्री- वे वरून खाली उतरल्यावर वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा टीबीएम लॉन्चिंग सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झाला.
कसा असेल संपूर्ण प्रकल्प?
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तयार करण्यात येणार्या प्रकल्पाची लांबी ९.९६ किलोमीटर एवढी असून त्यात ७ किलोमीटरचा मार्ग हा भुयारी मार्ग असेल. मुंबईतील या प्रकल्पाचा मार्ग मध्य, पश्चिम रेल्वे मार्गाखालून त्याचबरोबर मुंबई मेट्रो लाइन ३ च्या ५० मीटर खालून जाणार आहे.
हा गेमचेंजर प्रकल्प मुंबई कोस्टल रोड आणि अटल सेतू यांसारख्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांशी जोडला जाणार आहे. यामुळे भविष्यात वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची मुक्तता होणार आहे.
मुंबईच्या पूर्व उपनगराला पश्चिम उपनगरांशी जोडणारा अजून एक मार्ग या प्रकल्पाद्वारे तयार होणार आहे. या प्रकल्पासाठी ८ हजार ०५६ कोटी एवढा खर्च येणार आहे. तर डिसेंबर २०२८ पर्यंत या भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात येईल.
या प्रकल्पामुळे फ्री वे लँडिंग जवळ होणारी वाहतूक कोंडी कायमची दूर होणार आहे. या प्रकल्पाद्वारे पश्चिम उपनगरात जाणे किंवा नवी मुंबई एअरपोर्टला जाणे अधिक सोपे आणि वेगवान होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. नव्या मार्गामुळे इंधन आणि वेळेची बचत होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.