Kalamboli Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Accident: कळंबोलीत तेलाचा कंटेनर उलटला, दुचाकीवरून घसरून तरुणीचा मृत्यू

Kalamboli Container And Bike Accident: कळंबोलीत तेलाचा कंटेनर पलटी झालाय. कंटेनरमधील तेल मोठ्याप्रमाणात रस्त्यावर साडले. या तेलावरून घसरून दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झालाय.

Priya More

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

नवी मुंबईच्या (Navi Mumbai) कळंबोलीमध्ये तेलाचा कंटेनर पलटी (container overturns in kalamboli) झाल्यामुळे अपघात झालाय. कंटेनरमधील तेल मोठ्याप्रमाणात रस्त्यावर साडले. या तेलावरून घसरून दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झालाय. कळंबोली सर्कल येथे आज सकाळी हा अपघात झाला. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या अपघातामुळे सध्या कळंबलीमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कळंबोली सर्कल येथे तेलाची वाहतूक करणारा कंटेनर पलटी झाल्याने सर्वत्र तेल सांडले आहे. या तेलावरून घसरून एका दुचाकीस्वार तरुणीचा मत्यू झाला. राजनंदिनी जाधव (१९ वर्षे) असे या तरुणीचे नाव आहे. या अपघातामुळे घटनास्थळावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

तेलाची मालवाहतूक करणारा कंटेनर रस्त्यावर पलटी झाल्यामुळे कंटेनरमधील तेल रस्त्यावर सर्वत्र पसरले आहे. वाहतूक विभागामार्फत हा कंटेनर जेसीबीच्या सहाय्याने बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. तर कळंबोली अग्निशमन विभागातर्फे संपूर्ण रस्ता फोमच्या सहाय्याने धुण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच वाहतूक हळूहळू सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT