गुजरातमधील सुरतजवळ आज सकाळी अहमदाबाद-मुंबई डबल डेकर एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आलीय. अनेक रेल्वे अपघात समोर आले असून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यावरून विरोधकांच्या निशाण्यावर आलेत. पश्चिम रेल्वेने (डब्ल्यूआर) जारी केलेल्या निवेदनात याबाबत माहिती दिलीय. ही घटना सकाळी 8.50 च्या सुमारास घडली. जेव्हा ट्रेन (क्रमांक 12932) सायन आणि सुरत रेल्वे स्थानकांदरम्यान गोथंगम यार्डमध्ये पोहोचली होती. हाती आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाहीत. वेगळे केलेले डबेनंतर पुन्हा ट्रेनमध्ये जोडले गेले.
पश्चिम रेल्वेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर सांगितले की, घटनेनंतर लगेच दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर लूप लाइनवरून अप गाड्या चालवण्यात आल्या. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, या मार्गावरील इतर गाड्यांच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. पश्चिम रेल्वेने नंतर जाहीर केले की दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे आणि सकाळी 11.22 वाजता उप-मुख्य मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आलीय.
मालगाडीचे डबे रुळावरून घसरले
पालघरमध्ये काही दिवसापूर्वी पश्चिम रेल्वेच्या मालगाडीचा अपघात झाला होता. मालगाडीचे डबे घसरल्याची घटना घडल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे ४ डबे रुळावरून घसरलेत. या घटनेनंतर एकच रेल्वे प्रशासनाची एकच धावाधाव झाली होती.
पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीच्या मागील बाजूकडील चार डबे रुळावरून घसरले. या घटनेत कोणतीच जीवितहानी झालेली नव्हती. या घटनेनंतर रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. बोईसर रेल्वेस्थानकाच्या यार्डमध्ये माल खाली करण्यासाठी मालगाडी आली होती. पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर काहीही परिणाम झालेला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.