Navi Mumbai Rainfall Saam Tv News
मुंबई/पुणे

VIDEO: नवी मुंबईला मुसळधार पावसाने झोडपलं, कळंबोलीमध्ये रस्त्यांना नदीचे स्वरूप; अनेक वाहनं पडली बंद

Watterlogging In Kalamboli: नवी मुंबईसह पनवेल परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. कळंबोली परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. कळंबोली भागात पूराचा धोका निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामुळे नवी मुंबईकरांचे हाल होत आहे.

Priya More

नवी मुंबईला पहाटेपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने (Navi Mumbai Rain) झोडपून काढले आहे. पनवेल, कळंबोलीमध्ये जोरदार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. मुसळधार पावसामुळे स्थानिकांचे हाल होताना दिसत आहे. पावसाच्या पाण्यामध्ये अनेक वाहनं बंद पडली आहेत. त्यामुळे वाहन चालकांसोबत प्रवाशांचे देखील हाल झाले आहे.

नवी मुंबईसह पनवेल परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. कळंबोली परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. कळंबोली भागात पूराचा धोका निर्माण झाला आहे. कळंबोलीमधील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले आहे. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून अनेक वाहनं पाण्यामध्ये बंद पडली आहेत. काही ठिकाणी कार, रिक्षा आणि बस बंद पडल्या आहेत. त्यामुळे अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी देखील झाली आहे. या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. या पावसामुळे स्थानिक नागरिकांचे देखील हाल होत आहे.

कळंबोलीमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. कळंबोली रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे गाड्या अडकून पडल्या आहेत. मुंबईला येणारी मँगलोर एक्स्प्रेस अडकली आहे. या एक्स्प्रेसमधील काही प्रवासी खाली उतरून ते रुळावरून चालत निघाले आहेत. तर रुळावर पाणी साचल्यामुळे लोकल वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे.

दरम्यान, नवी मुंबईच्या पडघे, तळोजा, तळोजा एमआयडीसी परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांचे हाल होत आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरून नदीसारखे पाणी वाहत आहे. या पाण्यातून रिक्षा वाहून गेली. या मुसळधार पावसामुळे तळोजातील दुकानांमध्ये देखील पाणी शिरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amdar Niwas Canteen : मोठी बातमी! आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई

Dancing Car : आता काय म्हणावं? दोघांचा ताबा सुटला, दिवसाढवळ्या कारमध्येच जोडप्याचा रोमान्स, एकमेकांचे कपडे काढले अन्..., व्हिडिओ व्हायरल

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT