Manasvi Choudhary
चिकन फ्राय हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. मात्र अनेकांना हॉटेलस्टाईल चिकन फ्राय घरी बनवता येत नाही.
घरी चिकन फ्राय करण्याची रेसिपी सोपी आहे. तुम्ही सहजरित्या घरच्या घरी चिकन फ्राय करू शकता.
चिकन फ्राय बनवण्यासाठी चिकन, आलं- लसूण पेस्ट, दही, लिंबू, मसाला, हळद, गरम मसाला, चिकन मसाला, धने पावडर, कश्मिरी लाल मसाला, कॉर्नफ्लॉअर, तांदळाचे पीठ, मीठ, तेल, कढीपत्ता हे साहित्य घ्या.
चिकन फ्राय बनवण्यासाठी सर्वात पहिले चिकन स्वच्छ धुवून त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाका
स्वच्छ धुतलेल्या चिकनला पाणी काढून घ्या नंतर यात आले - लसूण पेस्ट, लिंबाचा रस, हळद, मसाला, मीठ, धने पावडर आणि गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
चिकन तळण्यापूर्वी कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचे पीठ मिश्रणात मिक्स करा यामुळे चिकन तळल्यानंतर कुरकुरीत होतील.
गॅसवर पॅनमध्ये गरम तेलात चिकन सोडा मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी चिकन चांगली लालसर फ्राय करून घ्या.