Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Shreya Maskar

दो दीवाने सहर में

मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' चित्रपट 20 फेब्रुवारी 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Do Deewane Shaher Mein | instagram

दिग्दर्शित कोण?

'दो दीवाने सहर में' चित्रपट संजय लीला भन्साळी निर्मित आणि रवी उदयवर दिग्दर्शित आहे.

Do Deewane Shaher Mein | instagram

मृणाल-सिद्धांतची जोडी

'दो दीवाने सहर में' चित्रपटात मृणाल ठाकूर सिद्धांत चतुर्वेदीसोबत मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसत आहे. पहिल्यांदाच मृणाल आणि सिद्धांतची जोडी एकत्र दिसत आहे.

Do Deewane Shaher Mein | instagram

चित्रपटाची कथा?

'दो दीवाने सहर में' चित्रपट दोन इम्परफेक्ट लोकांची गोष्ट सांगतो. त्यांचे प्रेम मात्र परिपूर्ण आहे. 'दो दीवाने सहर में' चित्रपटात मृणाल रोशनीची व्यक्तिरेखा तर सिद्धांत शशांकची व्यक्तिरेखा साकारली आहे.हा चित्रपट आजकालच्या आधुनिक प्रेम पद्धतीवर फिरतो.

Do Deewane Shaher Mein | instagram

बॉक्स ऑफिस कलेक्शन

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'दो दीवाने सहर में' चित्रपटाने दोन दिवसांत 2.85 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. 'दो दीवाने सहर में' चित्रपट तापसी पन्नूच्या 'अस्सी' सिनेमाला टक्कर देत आहे.

Do Deewane Shaher Mein | instagram

ओटीटी प्लॅटफॉर्म

'दो दीवाने सहर में' चित्रपट थिएटर गाजवल्यावर ओटीटीवर रिलीज होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'दो दीवाने सहर में' सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Do Deewane Shaher Mein | instagram

ओटीटी राइट्स

'दो दीवाने सहर में' चित्रपटाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने खरेदी केले आहेत. या चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट अद्याप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली नाही.

Do Deewane Shaher Mein | instagram

ओटीटी रिलीज डेट

मात्र मीडिया रिपोर्टनुसार, 'दो दीवाने सहर में' चित्रपट एप्रिल-मे महिन्यात ओटीटीवर पाहायला मिळेल असे बोले जात आहे. कारण थिएटर रिलीजनंतर चित्रपट 2-3 महिन्यात ओटीटीवर पाहायला मिळतो.

Do Deewane Shaher Mein | instagram

NEXT : "मी आरपार प्रेम करते..."; ब्रेकअपवर रिंकू खूप काही बोलली, 'त्या' नात्याबद्दल नेमकं काय म्हणाली?

Rinku Rajguru | instagram
येथे क्लिक करा...