Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai: शिंदेसेनेच्या नगरसेवकाला महिलेकडून चपलेने मारहाण, नवी मुंबईतील VIDEO व्हायरल

Navi Mumbai Corporator Attacked by Woman: नवी मुंबईत एका महिलेने भररस्त्यात शिंदेसेनेच्या नगरसेवकाला मारहाण केली. ऐरोलीमध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • ऐरोलीमध्ये नगरसेवकाला महिलेकडून मारहाण

  • अतिक्रमण कारवाईवरून वाद वाढला

  • चपलेने मारहाण करण्याचा प्रयत्न

  • नवी मुंबईतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

विकास मिरगणे, नवी मुंबई

नवी मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाला भररस्त्यात मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये रविवारी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. नगरसेवकाकडून काहीच कामं योग्यरित्या झाली नाही त्यामुळे या महिलेने नाराजी व्यक्त करत थेट नगरसेवकाला मारहाण केली. या घटनेमुळे नवी मुंबईत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महापालिकेचे कर्मचारी अतिक्रमण कारवाई करण्यासाठी ऐरोलीच्या यादवनगरमध्ये आले होते. त्यावेळी ही महिला पालिकेकडून होणारी कारवाई थांबवण्यात यावी अशी विनंती करण्यासाठी स्थानिक नगरसेवक राम आशिष यादव यांच्याकडे गेली होती. पण नगरसेवकाने या महिलेला मदत करण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर महिलेने भररस्त्यात नगरसेवकाला चपलेने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

दरम्यान, राम आशिष यादव हे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आहेत. ते आधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे देखील नगरसेवक होते. त्यांनी महानगर पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदेगटात प्रवेश केला होता. राम आशिष यादव यांच्यावर रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

राम आशिष यादव हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. २०१९ मध्ये एका तरुणीने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता आणि त्यांना अटक देखील झाली होती. पीडित तरुणीने आरोप केला होता की, राम आशिष यादवने अश्लील व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेलिंग करत दोन वर्षे तिच्यावर अत्याचार केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

Dombivli Crime: संतापजनक! मदतीसाठी बोलावलेल्या मित्राकडूनच अनाथ तरुणीवर अत्याचार

भोंदू मनोहर भोसलेला राजकीय आश्रय? भोसलेच्या वाढदिवसाला 90 आमदारांची हजेरी?

Pune Crime : पुण्यातील खेडमध्ये गुंडांच्या टोळीचा धुडगूस, नागरिकांवर हल्ला, एकाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले, VIDEO

SCROLL FOR NEXT