Navi Mumbai News 10-month-old baby falls into bucket and dies in Panvel Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai News: आईला डुलकी लागली अन् बाळाचा जीव गेला; मन सुन्न करणाऱ्या घटनेनं पनवेल हळहळलं

Panvel Baby Died: मन सुन्न करणारी ही घटना पनवेल शहरातील पळस्पे गावात रविवारी (५ नोव्हेंबर) दुपारसच्या सुमारास घडली.

Satish Daud

Ten Month Old Baby Died in Panvel

घरामध्ये खेळता-खेळता एका १० महिन्यांच्या बाळाचा बादलीत पडून दुर्देवी मृत्यू झाला. मन सुन्न करणारी ही घटना पनवेल शहरातील पळस्पे गावात रविवारी (५ नोव्हेंबर) दुपारसच्या सुमारास घडली. आशिक अल इमान (वय १० महिने) असं मृत बाळाचं नाव आहे. आशिकचा अचानक मृत्यु झाल्याने त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिकचे वडील रोजंदारीवर काम करतात. रविवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले. त्यामुळे घरात आशिक आणि त्याची आई दोघेच होते. दुपारच्या सुमारास घरातील कामे आवरुन झाल्यानंतर आशिकची आई त्याला घेऊन बेडरुमध्ये आराम करण्यासाठी गेली.

त्यावेळी आईला अचानक डुलकी लागली आणि आशिक खेळता-खेळात बाथरुममध्ये गेला. तिथे पाण्याने भरुन ठेवलेल्या बादलीत तो पडला. काही वेळाने आई झोपून उठल्यानंतर तिला आशिक दिसला नाही. घरात शोधाशोध केल्यानंतर तो बाथरूममध्ये प्लास्टिकच्या बादलीत पडलेला आढळून आला.

दरम्यान, आईने या घटनेची माहिती आशिकच्या वडिलांना दिली. त्यांनी तातडीने घरी धाव घेत बाळाला कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी बाळाला तपासून मृत घोषित केले. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT