रणजित मांजगावकर, साम टीव्ही
कोल्हापूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. गोव्याहून प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने येणारी ट्रॅव्हल्स बस शिराळा तालुक्यातील कोकरूड पुलावरून वारणा नदीपात्रात कोसळली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवाशांना दुसऱ्या वाहनातून पाठवण्यात आलं आहे. चालकाचं बसवरील नियंत्रण (Bus Accident) सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथामिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस १५ ते २० प्रवाशांना घेऊन गोव्याहून मुंबईच्या दिशेने येत होती.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील तुरकवाडी - आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरूडच्या असणाऱ्या पुलावर आली असता, पहाटे सहा वाजेच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स थेट वारणा नदीपात्रात कोसळली. सुदैवाने या अपघातात प्रवाशांना दुखापत झाली नाही.
समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झाला मेहकरनजिक खाजगी लक्झरी बसचा रस्त्याच्या कडेला उभी असताना मागून येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गणराज ट्रॅव्हल्सची बस मुंबईहून नागपूरच्या दिशेने जात होती.
पहाटे 5.45 वाजेच्या सुमारास मेहेकरनजिक बसच्या टायरची हवा चेक करण्यासाठी खाली उतरला होता. दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने बसला जोरदार धडक दिली. यात बस चालक जागीच ठार झाला. तर बस मधीलच एका प्रवाशाचा मृत्यू झाला. बसमध्ये एकूण ३७ प्रवाशी प्रवास करत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.