Navi Mumbai Metro Fare Reduce Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Metro: मेट्रोच्या तिकीट दरात मोठी कपात, नवी मुंबईकरांना दिलासा; जाणून घ्या नवे दर

Navi Mumbai Metro Fare Reduce: नवी मुंबई मेट्रोच्या तिकीट दरामध्ये कपात करण्यात आली आहे. गणेशोत्सवाला सुरूवात झाल्यापासून नवी मुंबई मेट्रोसाठी तिकीटाचे नवे दर लागू होतील.

Priya More

नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबईकरांना गणपती बाप्पा पावला आहे. कारण नवी मुंबईकरांचा मेट्रो प्रवास आता आणखी सुखकारक होणार आहे. मेट्रोच्या तिकीट दरामध्ये कपात करण्यात आली आहे. येत्या शनिवारपासून म्हणजे गणेशोत्सवाला सुरूवात झाल्यापासून नवी मुंबई मेट्रोसाठी तिकीटाचे नवे दर लागू होतील. या नव्या दरानुसार नवी मुंबईकरांना कमी किमतीमध्ये आता मेट्रो प्रवास करता येणार आहे.

जलद प्रवासाचा पर्याय असणाऱ्या नवी मुंबई मेट्रोचा लाभ अधिकाधिक प्रवाशांना घेता यावा यासाठी सिडकोकडून मेट्रोच्या तिकीट दरामध्ये कपात करण्यात आली आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही माहिती दिली आहे. सिडकोने बेलापूर ते पेंधर मार्गावरील नवी मुंबई मेट्रोच्या तिकीट दरांमध्ये ३३ टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. त्यामुळे उद्यापासून नवी मुंबईकरांना कमी पैशात मेट्रोचा प्रवास करता येणार आहे. सिडकोने जारी केलेल्या नव्या दरानुसार मेट्रोचे किमान दर १० तर कमाल दर ३० रुपये असणार आहे.

नवी मुंबई मेट्रोचे सुधारित दर -

- पहिल्या २ आणि २ ते ४ किलोमीटरसाठी - १० रुपये

- ४ ते ६ आणि ५ ते ७८ किलोमीटरसाठी - २० रुपये

- ८ ते १० किलोमीटरच्या टप्प्यासह त्यापुढील अंतराकरिता - ३० रुपये

नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत सिडकोने बेलापूर ते पेंधरदरम्यान मार्ग क्रमांक १ विकसित केला आहे. हा मार्ग सीबीडी बेलापूर ते तळोजा येथील गृहसंकुलांना दळणवळणाच्या दृष्टीने खूपच फायदेशीर ठरणार आहे. नव्या तिकीट दरांमुळे जवळ आणि लांबच्या अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा लाभ होणार आहे. याआधी बेलापूर ते पेंधर दरम्यानच्या अंतरासाठी ४० रुपये मोजावे लागत होते. आता प्रवाशांना हा प्रवास फक्त ३० रुपयांमध्ये करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजधानीत थरारक घटना! 5 मजली इमारत कोसळली; 50 हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

Makeup Tips: मेकअप करताना 'या' ७ चुका टाळा! नाहीतर फ्लॉलेस लूकऐवजी चेहरा दिसेल विचित्र

Silk Saree: महिलांसाठी सिल्क साड्यांचे युनिक कलेक्शन, या 8 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

Society Rules : घराबाहेर, लिफ्टसमोर चपलांचा रॅक ठेवणे पडेल महाग! सोसायट्यांचा कडक नियम; पाहा काय सांगतो कायदा!

SCROLL FOR NEXT