मुंबई : नवी मुंबईतील बेलापुरात एक ४ मजली कोसळल्याची घटना घडली. सीबीडी बेलापुरातील फसणपाडा गावात ४ मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेत एकाच मृत्यू झाला आहे. तर काही जखमी असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट नीती आयोगाच्या बैठकीतून प्रशासनाला मदतीच्या सूचना दिल्या आहेत.
बेलापुरातील शहाबाज गावात इमारत कोसळल्याची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. त्यानंतर इमारत दुर्घटनेतील आपत्तीग्रस्तांना तातडीने आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदेंनी महापालिका आयुक्तांना दिल्या.
मुख्यमंत्री शिंदे हे नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले आहेत. बैठकीला जाण्यापूर्वी तेथूनच त्यांनी मना आयुक्त कैलास शिंदे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. फोनवरील संभाषणादरम्यान त्यांनी बेलापूर इमारत दुर्घटनेशी संबंधित माहिती जाणून घेतली.
दरम्यान, या इमारत दुर्घटनेनंतर प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले. या घटनेतील आपत्तीग्रस्तांना तातडीचे उपचार, आरोग्य सुविधा, अन्नपाणी, कपडे, तात्पुरता निवारा आदी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात. पालिका आणि इतर सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आपत्तीग्रस्तांना तातडीने गरजेच्या वस्तू उपलब्ध करून द्यावात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, नवी मुंबईतील शहाबाज गावातील इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक बेपत्ता आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून 2 जणांचा मृत्यू झालाय. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला आहे. तर ढिगाऱ्याखाली आणखी एक मृतदेह आहे. या मृतदेहाला बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. एनडीआरएफचे जवान दुसरा मृतदेह काढण्यासाठी अथक प्रयत्न केला. या घटनेत अजून १ जण बेपत्ता आहे. त्या व्यक्तीचा शोध अद्याप लागलेला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.