VIDEO: Sharad Pawar वर्षा निवासस्थानी, Eknath Shinde यांच्यासोबत बंद दाराआड 20 मिनिटं चर्चा

Sharad Pawar Meets Eknath Shinde News: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, बंद दाराआड २० मिनिटं चर्चा झाल्याची माहिती.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड २० मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असून विधानसभेआधी जातीयतेढ निर्माण होऊ नये याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दुध संकलन कृषी आणि पाणी प्रश्न अशा महत्त्वाच्या विषयांवर देखील चर्चा करण्यात आली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांची भेट घेतली होती. यादरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यात लक्ष घालण्याची मागणी छगन भुजबळ यानी शरद पवार यांच्याकडे केली होती. आता त्याच पार्श्वभुमीवर शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com