Navi Mumbai Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Metro: नवी मुंबईत आणखी एक मेट्रो धावणार! तळोजा ते खांदेश्वर, असा असणार मार्ग, स्थानके कोणती? वाचा

Navi Mumbai Taloja-Khandeshwar Metro: नवी मुंबई मेट्रो २ ला मंजुरी दिली आहे. तळोजा ते खांदेश्वर अशी ही मेट्रो धावणार आहे. यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

Siddhi Hande

नवी मुंबई मेट्रो २ ला परवनागी

१५ वर्षांपूर्वी दिला होता प्रस्ताव

तळोजा ते खांदेश्वरदरम्यान धावणार

नवी मुंबईमधील दुसऱ्या मेट्रो मार्गाला अखेर मंजुरी मिळाली आहे. अनेक वर्षांच्या विलंबानंतर आता राज्य सरकारने या मेट्रो मार्गाला परवानगी दिली आहे. सिडकोने जवळपास १५ वर्षांपूर्वी हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर आता या मार्गाला परवानगी मिळाली आहे. या मेट्रो मार्गासाठी ५,५७५ कोटींची तरतूद केली आहे. यामुळे नवी मुंबईकरांचा प्रवास खूप सोपा होणार आहे. हा मेट्रो मार्ग पुढे नवी मुंबई विमानतळाशी जोडला जाणार आहे.

कसा असणार मार्ग? (Navi Mumbai Metro 2 Taloja to Khandeshwar)

नवी मुंबई मेट्रो तळोजा ते खांदेश्वरदरम्यान धावणार आहे. ८.१५ किमी लांब मेट्रो धावणार आहे. या मार्गिकेमुळे कामोठे, कळंबोली आणि तळोजा जोडले जाणार आहे. यामुळे पनवेल शहराचाही विकास होणार आहे. यामुळे नवी मुंबई शहराचा अजून झपाट्याने विकास होईल.

नवी मुंबई मेट्रोबाबत २०११ मध्ये प्रस्ताव मांडला होता. तेव्हा खर्चाची अपेक्षा १,६० होती. परंतु आता १५ वर्षांनी हा खर्च ५ हजार ५७५ कोटींवर पोहचला आहे.

कोणती स्थानके असणार?

या मेट्रो मार्गावर ८ स्थानके असणार आहेत. ही मार्गिका कामोठे, तळोजा एमआयडीसी, खांदेश्वरमधून जाणार आहे. या मार्गावर खांदेश्वर, कामोठे सेक्टर 10, कळंबोली सेक्टर 2E, कळंबोली सेक्टर 7E, कळंबोली सेक्टर 13, कडाडी, एमआयडीसी स्थानक 1, एमआयडीसी स्थानक 2 ही स्थानके असणार आहे. सध्या नवी मुंबईत बेलापूर ते पेंढार मेट्रो आहे. ही मेट्रोदेखील मेट्रो २ ला जोडण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत निर्णय झाला नाही.

खांदेश्वर, कामोठे, तळोजा एमआयडीसी परिसरातून रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यांना बस किंवा लोकलने जावे लागते. यासाठी वेळ लागतो. परंतु आता मेट्रो प्रवासामुळे वेळ वाचणार आणि आणि प्रवास सुद्धा जलद होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Tourism : धबधबे, डोंगर अन् घनदाट जंगल; 'बदलापूर'मध्ये लपलंय ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

डीएची घोषणा झाल्यावर ४ महिन्याचा एरियर मिळणार? केंदीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार परिणाम

8th Pay commission मुळे बेसिक पेमेंट किती वाढणार? समजू घ्या फिटमेंट फॅक्टरचे गणित

April Bank Holiday: पुढच्या आठवड्यात बॅंकांना किती सुट्ट्या असणार? RBI ने दिली यादी; वाचा

How To Make Gel Shampoo: या 3 गोष्टींनी घरीच बनवा जेल शॅम्पू, केसांची होईल मुळापासून वाढ

SCROLL FOR NEXT