Panvel Crime : गॅरेज तोडण्याचा वाद चिघळला; पनवेलच्या तळोजा गावात रॉड, चाकू आणि दांडक्यांनी हल्ला, चार जण जखमी

Panvel Taloja News : पनवेलच्या तळोजा गावात गॅरेज तोडल्याच्या रागातून धारदार शस्त्रांनी झालेल्या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.
Panvel Crime : गॅरेज तोडण्याचा वाद चिघळला; पनवेलच्या तळोजा गावात रॉड, चाकू आणि दांडक्यांनी हल्ला, चार जण जखमी
Pune Crime News Saam Tv
Published On
Summary
  • पनवेलच्या तळोजा गावात गॅरेज तोडल्याच्या वादातून हिंसाचार

  • धारदार शस्त्रांनी आणि दांडक्यांनी चार युवक गंभीर जखमी

  • मुख्य आरोपी रौफ रजाक पटेल अटकेत, इतर आरोपी फरार

  • तळोजा गावात तणावाचे वातावरण, पोलिसांची गस्त वाढवली

विकास मिरगणे - मुंबई

पनवेलमधील तळोजा गावात गॅरेज तोडल्याच्या रागातून हिंसाचाराची धक्कादायक घटना घडली आहे. ८ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास फरहान हार्डवेअर समोर, मन्नान कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर धारदार चाकू, लोखंडी रॉड, लाकडी बांबू आणि दांडक्यांनी बेछूट हल्ला करण्यात आला. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार, मोटार दुरुस्ती गॅरेजवरील तक्रारीच्या वादातून हा हल्ला झाला. सय्यद परिवाराच्या तक्रारीनंतर सीडको अतिक्रमण विभागाने तीन वेळा गॅरेज तोडले होते. याचा राग मनात धरून आरोपींनी हल्ला केला. ही घटना घडली तेव्हा घडली सय्यद कुटुंबातील काही युवक दुपारची नमाज अदा करत होते.

Panvel Crime : गॅरेज तोडण्याचा वाद चिघळला; पनवेलच्या तळोजा गावात रॉड, चाकू आणि दांडक्यांनी हल्ला, चार जण जखमी
Taloja MIDC Accident : २ पावलांवर मृत्यू बघितला, स्वतःला वाचवणार; तोच सुस्साट कारनं उडवलं, भीषण अपघाताचा CCTV

आरोपी रौफ रजाक पटेल (६०) याच्यासह अफनान पटेल, सफवान पटेल, नवमान मुनाफ पटेल आणि इतर आठ-दहा जणांनी सय्यद परिवारातील युवकांवर अचानक जीवघेणा हल्ला केला. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या नौफिल हानीफ सय्यद (४०) यांनाही मारहाण आणि धमकी देण्यात आली.सैफ हानीफ सय्यद (२४), सलमान सुफियान सय्यद (१९) आणि सफवान करीम तिदारे (२७) गंभीर जखमी झाले.

Panvel Crime : गॅरेज तोडण्याचा वाद चिघळला; पनवेलच्या तळोजा गावात रॉड, चाकू आणि दांडक्यांनी हल्ला, चार जण जखमी
Kalyan to Taloja Metro : कल्याण-तळोजा अंतर होणार कमी; कसा असेल मेट्रो-१२ चा मार्ग?

घटनेनंतर तळोजा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून स्टीलच्या चाकूचे कव्हर जप्त केले. मुख्य आरोपी रौफ रजाक पटेल याला ८ ऑगस्टच्या रात्री अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार आहेत. पोलिसांनी भादंवि कलम ३०७, ३२४, १४१, १४३, १४८, १४९, ५०४, ५०६ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि ब.ना.स. कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर तळोजा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी परिसरात गस्त वाढवली आहे.

Q

तळोजा गावातील हिंसाचाराची कारणे काय होती?

A

गॅरेज तोडल्याच्या रागातून आरोपींनी सय्यद कुटुंबातील युवकांवर हल्ला केला.

Q

या घटनेत किती लोक जखमी झाले?

A

या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

Q

पोलिसांनी काय कारवाई केली?

A

पोलिसांनी मुख्य आरोपी रौफ रजाक पटेल याला अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत.

Q

सध्या परिस्थिती कशी आहे?

A

तळोजा गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com