Kalyan to Taloja Metro : कल्याण-तळोजा अंतर होणार कमी; कसा असेल मेट्रो-१२ चा मार्ग?

Kalyan to Taloja Metro Route 12 Project: एकूण २२.२ किलोमीटर लांब असलेल्या या मेट्रो प्रकल्पासाठी ५,८६५ कोटी रुपये खर्च येणार आहे. कल्याण-तळोजा मेट्रो मार्गिकेवर एकूण १९ स्टेशन असणार आहेत.
Kalyan to Taloja Metro
Kalyan to Taloja Metro Saam TV
Published On

Route of Metro-12 :

कल्याण ते तळोजामधील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कल्याणमधून तळोजापर्यंत नागरिकांना सुखकर प्रवास करता यावा यासाठी कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग १२ उभारण्यात येणार आहे. रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते मेट्रो मार्ग १२ प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

Kalyan to Taloja Metro
Nagpur Metro: नागपूरकरांसाठी खूशखबर! मेट्रो तिकीटदरात कपात, नवे दर आजपासून लागू

कल्याण-तळोजा मेट्रोमधील स्थानके कोणती?

एकूण २२.२ किलोमीटर लांब असलेल्या या मेट्रो प्रकल्पासाठी ५,८६५ कोटी रुपये खर्च येणार आहे. कल्याण-तळोजा मेट्रो मार्गिकेवर एकूण १९ स्टेशन असणार आहेत.

स्थानकांची नावे

कल्याण

एपीएमसी कल्याण

गणेश नगर

पिसवली गाव

गोलवली

डोंबिवली एमआयडीसी

सोनारपाडा

मानपाडा

हेदुटणे

कोळेगाव

निळजे गाव

वडवली

बाले

वाकलन

तुर्भे

पिसरवे

अमनदूत

फायदे

मेट्रो १२ मुळे कल्याणहून नवी मुंबईला झटपट येता येणार आहे.

यासाठी कमी वेळ लागणार असून तब्बल ४५ मिनिटे आणखी वाचणार आहेत.

नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली दरम्यान कनेक्टिव्हिटी आणखी वाढेल.

मुंबई मेट्रो लाइन 12 मुळे मोठ्या संख्येने तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

विविध गुंतवणूकदार या शहरांमध्ये आपले व्यवसाय सुरू करतील.

या प्रकल्पामुळे खासगी वाहतूक वापरणाऱ्या व्यक्ती देखील सार्वजनीक वाहतुकीचा वापर करतील.

कल्याण - तळोजा दरम्यानच्या या मेट्रो १२ मार्गिकेचा उद्देश हा मुंबई, ठाणे , नवी मुंबई भागातील विकासाला गती देणे हा आहे.

मेट्रो १२ प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, ठाणे, भिवंडी आणि मुंबई येथील नागरिकांचे जीवनमान उंचावणार आहे.

सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रदूषण मोठ्याप्रमाणावर अटोक्यात येणार आहे. थेट ट्रेन उपलब्ध नसल्याने आतापर्यंत अनेक व्यक्ती कल्याणहून तळोजाला जाण्यासाठी रस्ते वाहतुकीचा वापर करतात. यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच वाहनांच्या धूराने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण निर्माण होते. या सर्व अडचणी मेट्रो १२ मुळे सुटणार आहेत आणि नागरिकांना सुखकर प्रवास करता येणारे.

Kalyan to Taloja Metro
Pune Metro : पुणेकरांसाठी खुशखबर! मेट्रोच्या नव्या मार्गिकेच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त; पाहा तारीख

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com