Nagpur Metro: नागपूरकरांसाठी खूशखबर! मेट्रो तिकीटदरात कपात, नवे दर आजपासून लागू

Nagpur Metro News: शाळा तसेत महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता नागपूर मेट्रोने १ मार्चपासून प्रवासी भाड्यामध्ये बदल केले आहेत.
Nagpur Metro
Nagpur MetroSaam Digital
Published On

Nagpur Metro Ticket Price

नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शाळा तसेत महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता नागपूर मेट्रोने १ मार्चपासून प्रवासी भाड्यामध्ये बदल केले आहेत. नवे दर सध्याच्या भाड्याच्या तुलनेत ३३ टक्क्यांनी कमी असतील.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nagpur Metro
Maharashtra Politics: महायुतीच्या उमेदवारीवरून धुसफूस, मोहिनी नाईकांनी घेतली पंतप्रधानांची भेट; भावना गवळींना आव्हान देणार?

कॅशबॅकही मिळणार

नागपूरमध्ये येत्या काळात महामेट्रो प्रवाशांकरीत 'कॅश बॅकची' नवी संकल्पना लागू करणार आहे. या संकल्पेअंतर्गत नागपूर मेट्रोने प्रवासासाठी महाकार्ड वापरणाऱ्या प्रवाशांना तिकीट दराच्या सवलत मिळणार आहे. एकूण ८०० रुपये पेक्षा जास्त खर्च केल्यास प्रवाशांना १०% पॉईंट्स मिळणार आहे.

हे पॉईट्स रिडीम करुन प्रवाशांना 'कॅश बॅक’ मिळवता येणार आहे. महत्वाचे म्हणजे महाकार्डवर मिळणाऱ्या १० % सूटमध्ये कुठलाही बदल नसून या सुटसोबत १०% `कॅश बॅक’मिळणार आहे. या योजनेला अंतिम स्वरूप देणे सुरु आहे. महा मेट्रोद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेली ३०% सवलत ही तशीच राहणार आहे.

तिकीटदरात कपात का?

नागपूर हे देशातील सर्वात उष्ण शहरांपैकी एक असून उन्हाळ्यातील तापमान अनेकदा ४० अशं सेल्सिअसच्या पार जातं. यामुळे नागरिक घरातून बाहेर पडणे टाळतात. महामेट्रोने प्रवासी भाड्यामध्ये बदल करून एकाप्रकारे कमी भाड्यात वातनुकूलित मेट्रो डब्यांमधून प्रवास करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे.

Nagpur Metro
Maharashtra Budget 2024 Highlights: अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये वाचा एका क्लिकवर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com