PM Modi to inaugurate Navi Mumbai International Airport on October 8, flights to start from December. saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Airport: यापुढे लंडनचं विमानतळ फिकं; काय आहे नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये

Navi Mumbai International Airport: पंतप्रधान मोदी ८ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. डिसेंबरपासून देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय आणि मालवाहू उड्डाणे सुरू होतील. त्याची जागतिक दर्जाची वैशिष्ट्ये जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

  • उड्डाण सेवा डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे.

  • हे मुंबई महानगर प्रदेशातील दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल.

विकास मिरगणे, साम प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या आठ ॲाक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्धाटन होणार आहे.मुंबई महानगर प्रदेशातील हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे. या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी केली जात आहे. दरम्यान या नवी मुंबई विमानतळाची काय खास बात आहे, ज्यामुळे यापुढे लंडनचं विमानतळ कसं फिकं वाटतंय ते जाणून घेऊ.

कधी सुरू होतील उड्डाणं

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ ऑक्टोबरला दुपारी २.४० वाजता विमानतळावर आगमन करतील. मोदी या विमानतळाचं उद्घाटन करतील. मात्र या विमानतळाची सेवा अद्याप सुरू होणार नाहीये. देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय आणि कार्गो सेवा डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे.

कसं आहे विमानतळ

विमानतळ उभारणीस एकूण खर्च १ लाख कोटी लागेल. एकूण ११६० हेक्टरवर विमानतळ उभारले जाणार आहे. एकूण चार टप्यात विमानतळ उभारलं जाणार आहे. या विमानतळावर दोन रनवे आहेत. दोन रनवेसाठी स्वतंत्र टॅक्सीवे तयार केले आहेत. जगातील सर्वात मोठ्या लंडन येथील हिर्थो विमानतळाशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची तुलना केली जातेय.

नवी मुंबई विमानतळ ते मुंबई विमानतळ मेट्रो सेवेने जोडणार आहे. तसेच मुंबई , ठाणे , नवी मुंबई , कल्याण डोंबिवली, कोस्टल रोडने विमानतळाशी जोडणार आहे. दरम्यान हे विमानतळ पहिले असे असेल की जे वॅाटर टॅक्सीने जोडले जाईल. अंतर्गत सर्व टर्मिनल एकमेकांना जोडले जाणार असून प्रवाशांच्या सोयीसाठी एकात्मिक प्रणाली तयार केली जाणार आहे.

विमानतळ पर्यावरणपूरक (Eco-friendly) असेल, हरित उर्जेचा वापर आणि जलसंधारण यावर विशेष भर देण्यात आलाय. कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची असून, अटल सेतू ते कोस्टल रोड तयार होणार आहे. संपूर्ण प्रकल्प चार वर्षांत पूर्ण होणार आहे. प्रवाशांसाठी “वन-अप एंड टू एंड बॅगेज फॅसिलिटी” ऍपमार्फत उपलब्ध होईल. टर्मिनलमध्ये डिजिटल आर्टच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे

. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा उपयोग विविध ऑपरेशनमध्ये केला जाणार आहे. यासह विमानतळावर 350 एअरक्राफ्ट पार्किंगची सुविधा असणार आहे. एक्झिट टॅक्सी वेद्वारे जोडण्यात येणार असून १५०० गाड्या, २० बस आणि २० ट्रकसाठी पार्किंग सुविधा सात कार्गो स्टैंड, ३८ जनरल एव्हिएशन स्टँड उभारण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: २५००० वरुन थेट ७१५०० रुपये, आठव्या वेतन आयोगात कोणाचा पगार कितीने वाढणार?

ChatGPT Go Plan: ₹4,788 किमतीचा ChatGPT Go प्लॅन आता पूर्णपणे मोफत, सबस्क्रिप्शन कसे क्लेम कराल?

Mumbai: मुंबईत मतदार यादीत अद्भुत किमया, एकाच घरात ६ आडनावं असलेल्या व्यक्ती; मनसेने सत्य आणलं समोर

Trikadasha Yog: 3 नोव्हेंबरपासून चमकणार 'या' राशींचं नशीब; गुरू आणि शुक्र बनवणार त्रिएकादश योग

Maharashtra Live News Update: पुण्यातील एचएनडी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्याचा आदेश आज होणार?

SCROLL FOR NEXT