Navi Mumbai Airport  X
मुंबई/पुणे

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाबाबत सर्वात मोठी बातमी, पहिल्या दिवसापासून १५ शहरात उड्डाणे

Navi Mumbai Airport News : नवी मुंबई विमानतळासंबंधित नवी माहिती समोर आली आहे. इंडिगो कंपनीची विमाने लवकरच नवी मुंबई विमानतळावरुन उड्डाण घेणार असल्याचे म्हटले जात आहे. या उड्डाणाबाबत करार झाला आहे.

Yash Shirke

विकास मिरगणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

नवी मुंबई विमानतळासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. इंडिगो आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड यांच्यामध्ये उड्डाणासंदर्भात पहिला करार झाला आहे. इंडिगोची विमानं लवकरच नवी मुंबई विमानतळावरुन उड्डाण घेणार आहेत. नवी मुंबई विमानतळ लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई विमानतळावरुन पहिल्या दिवसापासून १५ पेक्षा जास्त शहरांमध्ये १८ दैनंदिन उड्डाणे (३६ एअर ट्राफिक मॅनेजमेंट) सुरु करणार आहेत. नोव्हेंबर २०२५ पर्यंत ७९ दैनंदिन उड्डाणे (१५८ एटीएम) केले जाणार आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश असेल अशी माहिती समोर आली आहे. येत्या काळात आणखी काही विमान कंपन्यांसोबत नवी मुंबई विमानतळासंदर्भात करार होणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन १७ एप्रिल २०२५ रोजी झाले. मे महिन्यात देशांतर्गत तर जुलै महिन्यात आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुंबई विमानतळावरुन १५० पेक्षा जास्त उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित केली जाणार आहे. त्यानंतर मुंबई विमानतळाचे एक टर्मिनल कामकाजासाठी बंद केले जाईल.

पहिल्या दिवसापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन १५ हून जास्त शहरांमध्ये विमान उड्डाणे सुरु केली जातील. नोव्हेंबर २०२५ पर्यंत दैनंदिन ७९ विमान उड्डाणे होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या उड्डाणांमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश असेल. लवकरच हे विमानतळ पूर्णपणे सज्ज होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता, कुठे कोणता अलर्ट? वाचा सविस्तर

अजित पवारांचा शरद पवारांना मोठा धक्का, दौंडचा शिलेदार घड्याळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

WhatsApp वर 'Online' दिसणं टाळायचंय? ही सेटिंग बंद करा, फॉलो करा 'हे' टिप्स

Sunday Horoscope Update : चूक केली असेल तर लगेच माफी मागा…; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT