Pune Rain : पुण्यात रस्त्याला नदीचं स्वरुप; चालकाला धाडस नडलं, ट्रॅक्टर पाण्यातून नेला अन्... पाहा थरारक व्हिडीओ

Pune Rain Video : पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली येथे मुसळधार पावसामुळे रस्त्याला नदीचे स्वरुप आले. पाण्यातून एका चालकाने ट्रॅक्टर नेल्याचे कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Pune Rain Video
Pune Rain VideoSaam Tv
Published On

मागील चार ते पाच दिवसांपासून पुण्याच्या दौंड तालुक्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे. फक्त दौंडच नाही, तर पुण्यातील अनेक भागांमध्ये दमदार पाऊस पडत आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरच्या स्वामी चिंचोली येथे पावसामुळे नदीमय परिस्थिती निर्माण झाली आहे. या रस्त्यावरुन एकाने ट्रॅक्टर चालवत नेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वामी चिंचोली भागात रस्त्यावरुन एका चालकाने जीव धोक्यात घालून पाण्यात ट्रॅक्टर नेला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चालकाने उगाच धाडस करुन पाण्यातून ट्रॅक्टर नेला, ट्रॅक्टरसह तो देखील पाण्यात वाहून गेला असता असे काहीजण म्हणत आहे. काल याच ठिकाणी एक इनोव्हा कार वाहून गेली होती. इनोव्हा कारच्या व्हिडीओची देखील सोशल मीडियावर चर्चा होती.

Pune Rain Video
Pune Rain : पुण्यात रस्त्याची नदी झाली, इनोव्हा वाहून गेली, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला. दरवर्षी सात ते आठ जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री होत असते. पण यंदा मे महिन्यामध्येच मान्सून राज्यात दाखल झाला आहे. मान्सूनच्या एन्ट्रीनंतर लगेच राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे.

Pune Rain Video
Pune Dam Level : पुण्यात दिवसरात्र पाऊस, नद्या तुडूंब भरल्या; कोणत्या धरणात किती पाणी?

मुंबई, पुण्यासह राज्यभरात मान्सून दाखल झाला असून हवामान खात्याने मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. तर सिंधुदुर्गमध्ये उद्या रेड अलर्ट आहे. तर पालघरमध्ये यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

Pune Rain Video
Pune Rain : पुण्यात पावसाचा पहिला बळी, अंगावर भिंत पडल्याने ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com