Pune Rain : पुण्यात रस्त्याची नदी झाली, इनोव्हा वाहून गेली, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

Pune Rain News : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील स्वामी चिंचोली येथे पावसामुळे पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाच्या पाण्यामुळे एक इनोव्हा कार वाहून गेल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Pune Rain
Pune RainSaam Tv
Published On

मंगेश कचरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

मागील चार दिवसांपासून पुण्यातील दौंड तालुक्यात पावसाचा जोर सुरु आहे. पावसामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. पावसाच्या हाहाकारामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील एक इनोव्हा कार वाहून गेली. अवकाळी पावसामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्पा झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दौंड तालुक्याप्रमाणे पुण्यातील इतर ठिकाणीही पावसाचा कहर पाहायला मिळाला. पुण्याच्या इंदापूर तालुक्यात अवकाळी पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुका जलमय झाला आहे. विशेषत: भिगवण येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्विस रोडवर पाण्याचे तळे साचले आहे. अंदाजे तीन किलोमीटरपर्यंतचा सर्विस रोड पाण्याखाली गेला आहे.

Pune Rain
Dombivli Crime : डोंबिवली हादरली! १५ वर्षीय मुलीचं अपहरण, खोलीत कोंडून लैंगिक अत्याचार, गर्भपातानंतर नको ते केलं...

मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन

महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. काल केरळमध्ये मान्सून दाखल झाला आणि अवघ्या काही तासांमध्ये महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री झाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये मुंबईसह आसपास मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. नेहमीपेक्षा १२ दिवस आधी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.

Pune Rain
MP: आणखी एक 'निर्भया'! प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड अन्...; गर्भाशय शरीराबाहेर आढळलं, नराधमांचं महिलेसोबत अमानवी कृत्य

दरवर्षी जून महिन्यामध्ये मान्सूनचे महाराष्ट्रामध्ये आगमन होते. पण या वर्षी १२ दिवसांपूर्वीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. जून ऐवजी मे महिन्यातच मान्सूनची एन्ट्री झाली आहे. मान्सूनच्या एन्ट्रीपूर्वी राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा जोर सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आहे.

Pune Rain
Vaishnavi Hagawane : सासरच्यांकडून होणारा छळ नाही, तर वैष्णवीचं सर्वात मोठं दु:ख 'हे' होतं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com