Navi Mumbai Ferry Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Ferry: नवी मुंबईवरुन भाऊचा धक्का फक्त ३० मिनिटांत; फेरीचं तिकीट किती? वाचा सविस्तर

Navi Mumbai Nerul to Bhaucha Dhakka Ferry Start From Dec 15: आता नवी मुंबई ते भाऊचा धक्का फेरी सर्व्हिस सुरु होणार आहे. यामुळे नवी मुंबई ते मुंबई प्रवास फक्त ३० मिनिटांत होणार आहे.

Siddhi Hande

मुंबई ते नवी मुंबई प्रवास फक्त ३० मिनिटांत

नेरुळ ते भाऊचा धक्का फेरी सर्व्हिसमुळे एक तास वाचणार

१५ डिसेंबरपासून होणार सुरु

नवी मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. नवी मुंबईतून जलवाहतूक लवकरच सुरु होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जलवाहतूकीचा प्रकल्प सुरु करण्याची तयारी होती. त्यानंतर आता ही फेरी सर्व्हिस सुरु होणार आहे. नेरुळ आणि भाऊचा धक्का अशी फेरी सर्व्हिस १५ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ही सेवा सिडकोने बांधलेल्या नेरुळ पॅसेंजर वॉटर टर्मिनलसाठी महत्त्वाचा टप्पा असणार आहे.

फक्त ३० मिनिटांत नवी मुंबई ते मुंबई गाठता येणार (Nerul to Bhaucha Dhakka in Just 30 Minutes)

या नवीन फेरी सर्व्हिसमुळे क्रॉस हार्बरचा प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरुन ३० मिनिटे होणार आहे. म्हणजे जवळपास १ तासाचा वेळ वाचणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, दररोज ४ फेरी जाणार आहे. या जहाजामध्ये २० आसने असणार आहेत. म्हणजे २० प्रवासी एकावेळी प्रवास करु शकतात.

भाडे किती? (Nerul-Bhaucha Dhakka Ferry Fare Tickets)

नेरुळ ते भाऊचा धक्का फेरीचे भाडे ९३५ रुपये असणार आहे. त्यामुळे एकदा प्रवास करण्यासाठी प्रत्येक प्रवाशाला ९३५ रुपये भरावे लागणार आहे. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या फेरीचे लाँच ठरलेल्या वेळेत होणार आहे.

प्रवासाचा नवीन मार्ग सुरु

सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी सांगितले की, ही सेवा खूप महत्त्वाचा दुवा असणार आहे. विमानतळ, मेट्रो आणि नवीन रस्त्यांचं काम सुरु असल्याने जलवाहतूक हा महत्त्वाचा कनेक्टर असणार आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ खूप वाचणार आहे. नेरुळ टर्मिलनवरुन आता अनेक ठिकाणी जाता येणार आहे. टर्मिनळवरुन आधीच नेरुळ ते एलिफंटा सेवा सुरु होती. यानंतर आता ही सेवा सुरु होत आहे.

याबाबत दृष्टी ग्रुपच्या वॉटरफ्रंट एक्सपिरीयन्सेस मुंबई प्रायव्हेट लिमिटेडच्या फेरी ऑपरेटरने सांगितले की, नेरुळ ते मुंबई या फेरी मार्गासाठी सुरक्षा उपाययोजना सुरु आहे. सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट घालणे आवश्यक आहे. याचसोबत प्रवाशांनी संख्या वाढवणे हे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

जानेवारीपर्यंत स्पीडबोट शो आणि जेट स्कीइंगसह वॉटर स्पोर्ट्स सुरु करु. याचसोबत फ्लोटिंग रेस्टॉरंट आणि फ्लेमिंगो पर्यटनदेखील सुरु करणार आहे. या नवीन उपक्रमाअंतर्गत मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना फ्लेमिंगो असलेल्या DPS तलावाजवळून नेण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khandeshi Papad Kushmur Khuda Recipe: खानदेशी कुसमुर पापड खुडा

Maharashtra Live News Update: थंडीचा कडाका वाढला, मुंबई पुण्यासह महाराष्ट्र गाराठला

Election : महापालिका निवडणुकीआधी शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का, १६ बड्या नेत्यांनी केला जय महाराष्ट्र

lucky zodiac signs: आज कन्या राशीत चंद्राचा प्रवेश; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी दिवस लकी

उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई; 4 तहसीलदारांसह दहा जण निलंबित, प्रशासनात खळबळ

SCROLL FOR NEXT