Turbhe News  Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai Crime News: सोशल मीडियावर ओळख.. प्रेम.. संशय... अन् हत्या; बँक मॅनेजर तरुणीचा प्रियकराकडून लॉजमध्ये खून

Navi Mumbai Crime News : अमित रवींद्र कौर ( वय 35)असं मृत तरुणीचं नाव आहे. मृत तरुणी एका खासगी बँकेच्या मॅनेजर म्हणून नोकरी करत होती. तर शोएब शेख (24) असं आरोपी प्रियकराचं नाव आहे.

प्रविण वाकचौरे

Navi Mumbai:

प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना नवी मुंबईतील तुर्भे येथून समोर आली आहे. महिलेचे दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय तिच्या प्रियकराला होता. यातूनत त्याने तिची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

अमित रवींद्र कौर ( वय 35)असं मृत महिलेचं नाव आहे. मृत महिला एका खासगी बँकेच्या मॅनेजर म्हणून नोकरी करत होती. तर शोएब शेख (24) असं आरोपी प्रियकराचं नाव आहे. दोघांची सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. अमित कौरचा काहीच वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यानंतर दोघे सप्टेंबर २०२३ पासून एकमेकांना डेट करत होते.

शोएब आणि अमित यांच्या प्रेससंबध असले तरी शोएबच्या डोक्यात भलतच काहीतरी सुरु होती. अमितचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय शोएबला होता. अमित आपल्याला फसवत आहे, असा संशय शोएबला होता. यातून शोएबने अमितला संपवण्याचा निर्णय घेतला.

८ जानेवारी रोजी अमितचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त दोघांना भेटायचं ठरवलं होत. शोएबने आधी अमितच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. त्यानंतर दोघांना तुर्भे येथील लॉजमध्ये एक रुम बूक केला. रुममध्ये शोएब आणि अमितमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यानंतर शोएबने अमितचा गळा आवळून तिची हत्या केली.

मध्यरात्रीच शोएब लॉजमधून बाहेर पडला, तेथील कर्मचाऱ्यांनी देखील त्याला पाहिले. मात्र त्यांना फारसा संशय आला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी पोलिसांनी खोली उघडली तेव्हाच त्यांना अमित कौरचा मृतदेह खोलीत आढळून आला.

लॉजमधून बाहेर पडल्यानंतर शेख त्याच्या साकीनाका येथील घरी परतला होता. साकीनाका पोलिसांना त्याला घरातून अटक केली असून त्याला तुर्भे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. आरोपी शोएब शेख विरोधात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT