Pune Crime News: लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने थेट कट्यार काळजात घुसवली! वऱ्हाड्यांची धावपळ, नेमकं काय घडलं

Crime In Wedding Ceremony: मंगल कार्यालय चालक सणस यांनी अभिजीत आणि नातेवाईकांना टेबल-खुर्ची सरकावण्यास सांगितले. या कारणावरून अभिजीत आणि त्याच्याबरोबर असलेल्या नातेवाईकांनी सणस यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV
Published On

अक्षय बडवे

Pune:

पुण्यातून एक धक्कादायाक बातमी समोर आली आहे. लग्नसमारंभात किरकोळ वादातून नवरदेवाच्या हातून गंभीर गुन्हा झालाय. मंगल कार्यालय चालकाशी वाद झाल्याने नवरदेवाला राग अनावर झाला. पुढे रागाच्या भरात नवरदेवाच्या हातून मोठा गुन्हा झाला. त्याने थेट हातात असलेली कट्यार मंगल कार्यालय चालकावर चालवली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Crime News
Pune News : शतक मोहत्सवी नाट्य संमेलनात कलाकार, नाट्य रसिकांची हजेरी

घडलेल्या घटनेमुळे विवाहाच्या दिवशीच नवरदेवावर गुन्हा दाखल झाला आहे. करण सणस यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणी अभिजीत मिरगणे, राहुल सरोदे यांसह इतर ५ ते ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणस यांचे पुणे-सोलापूर रस्त्यावरील उरळी कांचन भागात श्रीकृष्ण मंगल कार्यालय आहे. हा सगळा प्रकार ६ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान याच ठिकाणी घडला. या ठिकाणी आरोपी नवरदेव अभिजीत याचा विवाह संपन्न झाला होता. लग्न सुरळीत पार पडल्यानंतर मोठं विघ्न समोर येणार आहे याची कुणालाच काही कल्पना नव्हती.

विवाह समारंभानंतर अभिजीत आणि नातेवाईक स्टेजजवळ टेबल-खुर्ची मांडून जेवण करत होते. त्यामुळे तेथून इतर काही जणांना ये-जा करता येत नव्हती. मंगल कार्यालय चालक सणस यांनी अभिजीत आणि नातेवाईकांना टेबल-खुर्ची सरकावण्यास सांगितले. या कारणावरून अभिजीत आणि त्याच्याबरोबर असलेल्या नातेवाईकांनी सणस यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. सणस यांना शिवीगाळ करुन त्यांच्या हातावर अभिजीतने त्याच्याकडे असणाऱ्या कट्यारने वार केला.

कट्यारीला धार नसल्याने फिर्यादी यांना गंभीर दुखापत झाली नाही. मात्र मारहाणीच्या घटनेमुळे त्यांनी पोलिसांत धाव घेतली. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Pune Crime News
Beed Crime News: ३० हजारात बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टरच्या सहकाऱ्यांसह आवळल्या मुसक्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com