CIDCO announces 4,508 affordable homes under a first-ever FCFS housing scheme across Navi Mumbai. saam tv
मुंबई/पुणे

Cidco Homes : स्वस्तात मस्त! लॉटरी नाही थेट आवडीचे घर, ४५०८ घरे विक्रीसाठी निघाली, सरकारकडून ₹२५०००० ची सब्सिडी

CIDCO Housing Scheme 2025: सिडकोकडून नवी मुंबईमध्ये ४५०८ घरांची घोषणा करण्यात आली असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने थेट आवडीचे घर निवडता येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र अर्जदारांना ₹२.५ लाख सबसिडी मिळणार आहे.

Namdeo Kumbhar

  • नवी मुंबईतील ४५०८ घरे सिडकोकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने उपलब्ध.

  • प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांना ₹२.५ लाखांचे अनुदान.

  • तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथे ही घरे उपलब्ध.

  • २२ नोव्हेंबर ते २१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज; २८ डिसेंबरपासून थेट आवडीचे घर निवडण्याची सुविधा.

Flat locations & prices in CIDCO projects — Taloja, Ghansoli, Kharghar, Dronagiri, Kalamboli : निवडणुकीच्या तोंडावर सिडकोकडून नवी मुंबईमध्ये ४५०८ घरांची लॉटरी काढण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर घराची विक्री होणार आहे. आज सायंकाळी ४ वाजेपासून (22 नोव्हेंबर 2025) ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात होणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सदनिकांसाठी राज्य सरकारकडून २.५ लाख रूपयांची सब्सिडी दिली जाणार आहे. स्वप्नातील घरासाठी  21 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. अर्ज केलेल्या पात्र अर्जदारांना 28 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजेपासून त्यांच्या आवडीचे घर निवडता येणार आहे.

सिडकोची ४५०८ घरं कुठे आहेत?

मुंबई आणि उपनगरात राहणाऱ्या प्रत्येकालाच आपल्या स्वप्नातील घर घ्यायचे असते. पण प्रचंड वाढलेल्या किंमतीमध्ये घर घेता येत नाही. पण सिडकोकडून स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नवी मुंबईमध्ये ४५०८ घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" या योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथे घरे उपलब्ध करून दिली आहेत. अर्जदार आपल्या आवडीचे घर निवडू शकणार आहे.

cidcofcfs.cidcoindia.com

लॉटरी-सोडत विसरा, थेट आवडीचे घर CIDCO FCFS vs lottery — benefits of choosing your preferred flat directly

सिडकोकडून इतिहासात पहिल्यांदाच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना राबवण्यात आली आहे. ४५०८ घरांसाठी सिडकोकडून लॉटरी अथवा सोडत काढली जाणार नाही तर थेट आवडीचे घर निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या स्वप्नातील घर साकारता येणार आहे. सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केलेय.

सरकारकडून ₹२५०००० ची सब्सिडी CIDCO housing subsidy ₹2.5 lakh eligibility and documentation requirements

तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथे सिडकोच्या गृहसंकुलांतील उर्वरित 4,508 घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ४५०८ घरांपैकी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता 1,115 तर अल्प उत्पन्न गटाकरिता 3,393 घरे उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रु. 2.50 लाख अनुदान मिळणार आहे. त्यामुळे सिडकोकडून ठरवण्यात आलेल्या किंमतीत आणखी घट होणार आहे.

स्वप्नातील घरासाठी कुठे कराल अर्ज ? How to apply for CIDCO 4,508 homes under FCFS scheme in Navi Mumbai

घराच्या किंमतीच्या संपूर्ण रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदारांना लगेच गराचा ताबा देण्यात येणार आहे. कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पात्र अर्जदारांना आवडचे घर निवडता येणार आहे. घरासाठी cidcofcfs.cidcoindia.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. सदनिकेचे क्षेत्रफळ, किंमत इ. देखील सदर संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT