Gurunath Chinchkar case 
मुंबई/पुणे

Navi mumbai : कथित छापेमारी ते १०-१५ कोटींसाठी प्रेशर; बिल्डर आत्महत्या प्रकरणात मुंबई, नवी मुंबईतील बड्या अधिकाऱ्यांची नावे

Navi Mumbai Builder Suicide Case: नवी मुंबईतील बिल्डर गुरुनाथ चिंचकर आत्महत्या प्रकरणात एनसीबी आणि पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप झाले आहेत. खंडणी आणि मानसिक छळामुळे आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबाने केला आहे.

Namdeo Kumbhar

विरास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी

Gurunath Chinchkar suicide case NCB officers FIR details : नवी मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांच्या आत्महत्या प्रकरणात आता खळबळजनक वळण आले आहे. याप्रकरणी NCB (नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फेब्रुवारी २०२५ मध्ये सुरू झालेल्या या प्रकरणात, एनआरआय कोस्टल पोलिसांनी NCB चे झोनल डायरेक्टर अमित घावटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवला आहे. मृताच्या पत्नी डॉ. किरण चिंचकर यांनी आरोप केला आहे की, या अधिकाऱ्यांनी खंडणीसाठी दिलेल्या मानसिक त्रासामुळेच गुरुनाथ चिंचकर यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. कोणतीही वॉरंट नसताना १५-२० जणांच्या पथकाने चिंचकर यांच्या घरावर छापा टाकला आणि घरातील सदस्यांशी गैरवर्तन केले. मुलाला खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवून १५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

सुमारे एक वर्षापूर्वी गुरुनाथ चिंचकर यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या मुलाला ड्रग्जच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवून, त्यांच्याकडून १० ते १५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, असा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. याच मानसिक त्रासातून आणि नैराश्यातून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) कथित छाप्यापासून सुरू झालेला हा धक्कादायक प्रकार आता हाय-प्रोफाइल एफआयआरमध्ये (FIR) रूपांतरित झाला आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये घडलेल्या या प्रकरणात, एनआरआय कोस्टल पोलिसांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. मृताच्या पत्नी डॉ. किरण चिंचकर यांनी आरोप केला आहे की, संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या पतीचा इतका छळ केला की त्यांनी आपले जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

दाखल एफआयआरनुसार, एनसीबी अधिकारी आकाश मलिक यांच्या नेतृत्वाखालील १५ ते २० जणांच्या पथकाने चिंचकर यांच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी कोणत्याही सर्च वॉरंटशिवाय घरातील मोबाईल फोन जप्त करण्यात आले आणि कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करण्यात आले. डॉ. किरण यांचा दावा आहे की, त्यानंतर एनसीबीच्या झोनल कार्यालयात अमित घावटे यांनी त्यांना धमकावून १५ कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली होती.

कायद्याच्या अंमलबजावणीच्या नावाखाली नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आल्याचे दस्तऐवजांतून समोर येत आहे. डॉ. चिंचकर यांच्या मते, त्यांना अनेकदा रात्री ९ वाजेपर्यंत बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवण्यात आले आणि कोणत्याही प्रतीशिवाय जबरदस्तीने पंचनाम्यावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. कुटुंबाने कोट्यवधींची मागणी पूर्ण करण्यास असमर्थता दर्शवल्यावर दबाव अधिक वाढवण्यात आला. या प्रकरणात बेलापूर एनसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनी एका गुन्हेगारासह गुरुनाथ यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा अपमान केला आणि फोनवरून वारंवार त्रास दिला, असेही आरोप आहेत.

सततचा मानसिक दबाव आणि आत्मसन्मानाला बसलेली ठेच यामुळे गुरुनाथ चिंचकर पूर्णपणे खचले होते. तणावामुळे त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊन रुग्णालयातही दाखल व्हावे लागले होते. अखेर २५ एप्रिल २०२५ रोजी, पत्नीला 'एनसीबीसोबत मीटिंग आहे' असे सांगून ते कार्यालयात गेले आणि तिथे स्वतःवर गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी सर्व दोषी अधिकाऱ्यांची नावे स्पष्टपणे लिहिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Fire : गॅस लायटर कंपनीला भीषण आग, ३०-३५ बकऱ्या होरपळल्या

New Covid Variant : कोरोना पुन्हा आला, ७५ म्यूटेशनसह नवा व्हेरियंट, तुम्हाला किती धोका?

Sunday Horoscope: कामाचा ताण जाणवेल, ५ राशींना नव्या नोकरीच्या संधी; वाचा रविवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: पुण्यात कचरा डेपोला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Masala Chana Dal Recipe : उन्हाळ्यात बनवा चटपटीत मसाला डाळ, संध्याकाळची छोटी भूक जाईल पळून

SCROLL FOR NEXT