Navi Mumbai MIDC Fire News Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai Fire: नवी मुंबईत अग्नितांडव, पावणे एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी

Navi Mumbai MIDC Fire: नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. पावणे एमआयडीमधील एका केमिकल कंपनीला गुरुवारी सकाच्या सुमारास भीषण आग लागली आहे.

Satish Daud

Navi Mumbai MIDC Fire News

नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. पावणे एमआयडीमधील एका केमिकल कंपनीला गुरुवारी सकाच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याचं कळताच कंपनीतील कर्मचाऱ्यांनी तातडीने बाहेर धाव घेतली. क्षणार्धात आगीचा मोठा भडका उडाला असून परिसरात धुराळे लोळ पसरले आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने या आगीच कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. मात्र, आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील (Navi Mumbai) पावणे एमआयडीसी परिसरातील मेहक केमिकल कंपनी आहे. प्लॉट नंबर W5 आणि W6 वर असलेल्या या कंपनीत गुरुवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कंपनीत अचानक आग लागली.

क्षणार्धात आगीचा भडका उडाला अन् एकापाठोपाठ एक असे भीषण स्फोट झाले. आग इतकी भीषण होती, की परिसरात धुराचे लोळ पसरले. कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वेळीच बाहेर धाव घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, कंपनीला आग लागल्याचं कळताच परिसरात मोठा हाहाकार उडाला. प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

SCROLL FOR NEXT