Maharashtra Politics: महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला; शिवसेना ठाकरे गटाला किती जागा मिळणार?

Maharashtra Politics News: महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागांचं वाटप करण्यासाठीचा फॉर्म्युला दिल्लीत ठरला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
Lok Sabha 2024 Election Maha Vikas Aghadi Seat Sharing Formula Maharashtra Political Updates
Lok Sabha 2024 Election Maha Vikas Aghadi Seat Sharing Formula Maharashtra Political UpdatesSaam TV
Published On

Maharashtra Political Latest News

देशातील सर्वच पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात महायुतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीने बैठकीचा धडका लावला आहे. त्याचबरोबर निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी रणनीती देखील आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला देखील ठरवला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lok Sabha 2024 Election Maha Vikas Aghadi Seat Sharing Formula Maharashtra Political Updates
Arvind Kejriwal: मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना अटक होणार? 'आप' नेत्यांच्या ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. महायुतीत भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे तीन मोठे पक्ष आहेत. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) असे तीन प्रमुख पक्ष आहेत.

प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. या जागांचे वाटप करण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी फॉर्म्युला ठरवला आहे. (Latest Marathi News)

महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागांचं वाटप करण्यासाठीचा फॉर्म्युला दिल्लीत ठरला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या फॉर्म्युल्यानुसार, काँग्रेसला २१ ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला १७ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाला ६ जागा आणि वंचित बहुजन आघाडी २ जागा, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ जागा मिळणार, असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झाला नसून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात वाटाघाटीची सुरुवात २२ ते २३ जागांपासून होऊ शकते. चर्चेअंती दोन्ही पक्ष किमान तीन जागांवर पाणी सोडण्यासही तयार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून बैठकांचे सत्र सुरू असतानाच महायुतीकडूनही आढावा बैठका सुरू आहेत. राज्यात भाजप लोकसभेच्या २६ जागा, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मिळून २२ जागा देण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. मात्र, अद्यापही यावर निर्णय झालेला नाही.

Lok Sabha 2024 Election Maha Vikas Aghadi Seat Sharing Formula Maharashtra Political Updates
Weather Forecast: सावधान! पुढील ४८ तासांत कोसळणार अतिमुसळधार पाऊस; IMD कडून 'या' राज्यांना अलर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com