Arvind Kejriwal Latest News
Arvind Kejriwal Latest NewsSaam Tv

Arvind Kejriwal: मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना अटक होणार? 'आप' नेत्यांच्या ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ

Arvind Kejriwal News: लवकरच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होऊ शकते, असा अंदाज आदमी पक्षाच्या नेत्यांनी लावला आहे.
Published on

Arvind Kejriwal Latest News

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर केजरीवाल यांनी चौकशीसाठी जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होऊ शकते, असा अंदाज आदमी पक्षाच्या नेत्यांनी लावला आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Arvind Kejriwal Latest News
Weather Forecast: सावधान! पुढील ४८ तासांत कोसळणार अतिमुसळधार पाऊस; IMD कडून 'या' राज्यांना अलर्ट

आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी एकामागून एक ट्वीट करत केजरीवाल यांच्या घरी ईडीची छापेमारी आणि त्यांच्या अटकेचा अंदाज लावला आहे. ईडी पथक उद्या म्हणजेच गुरुवारी पहाटे मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरी पोहोचून त्यांना अटक करणार असल्याची माहिती आहे, असं खळबळजनक ट्वीट दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केलं आहे.

त्याचवेळी राज्यसभा खासदार आणि आप नेते संदीप पाठक यांनी देखील पोस्ट करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर उद्या सकाळी ईडीकडून छापा टाकण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय 'आप' नेते आतिशी यांनी देखील बुधवारी रात्री उशिरा ट्वीटवर एका पोस्ट करत अरविंद केजरीवाल यांच्या घरी छापा पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

दरम्यान, एकीकडे ईडीची धास्ती काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेली असताना केंद्राच्या सर्वात शक्तीशाली संस्थेला न जुमानण्याचे धाडस दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करीत आहेत. सलग तीन समन्स येऊन सुद्धा ईडी चौकशीला हजर न राहिल्याने केजरीवाल काही लपवत आहेत की राजकीय फायदा करून घेत आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

परंतु केजरीवालांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. समन्स बजावूनही चौकशीला हजर न राहिल्याने ईडी केजरीवालांविरोधात न्यायालयात जाऊ शकते. एखाद्याने तीन नोटीसना उत्तर दिले नाही तर ईडीला त्याविरोधात न्यायालयाची पायरी चढण्याचा अधिकार आहे. कोर्ट केजरीवालांविरोधात अजामिनपात्र वॉरंट ईशू करण्यास सांगू शकते. तरीही ते चौकशीला हजर झाले नाही, तर न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांना अटक केली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com