natives angry on administration of somatane toll plaza for collecting fee  Saam Tv
मुंबई/पुणे

Somatane Toll Plaza: स्थानिकांसाठी सोमाटणे नाका टोलमुक्त आश्वासन हवेत, नागरिक संतप्त

natives angry on administration of somatane toll plaza for collecting fee : शेकडो वाहने टोल नाक्यावर अडकून पडतात. हा टोल नाका बेकायदेशीर आहे. तो बंद झालाच पाहिजे अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

दिलीप कांबळे

सोमाटणे टोल नाका हटविण्यासाठी मागील काही वर्षांपासून आंदोलने आणि इतर विविध मार्गांनी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान स्थानिक नागरिकांना टोल मधून सवलत मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र असे असताना टोल प्रशासनाकडून स्थानिकांकडून टोलची आकारणी केली जात आहे. यामुळे नागरिकांमधून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत.

दररोज सोमाटणे टोल नाक्यावरून मावळ ते पिंपरी चिंचवड असा दिवसभर प्रवास करणारे अनेक प्रवासी आहेत. मात्र दर फेरीला सोमाटणे टोल नाका येथे टोल घेतला जात आहे. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी वर्षभरापूर्वी टोल नाका आंदोलनादरम्यान स्थानिकांना टोल आकारणी केली जाणार नाही. स्थानिक गाड्या या टोलमुक्त असतील अशी घोषणा केली होती. मात्र आता टोल प्रशासनाकडून या घोषणेला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

डॉ. केदार वालसंगकर (स्थानिक नागरिक) म्हणाले सोमाटणे टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांना टोल मध्ये सवलत आहे. मात्र टोल प्रशासनाकडून जबरदस्तीने स्थानिक नागरिकांकडून टोल वसुली केली जाते.

कारला फास्टॅग नसल्याने कर्मचाऱ्यांनी कारच्या क्रमांकावरून टोलचे पैसे बँक खात्यातून कापून घेतले. त्याबाबत एसएमएस आल्यानंतर नागरिकांना समजते. याचा प्रशासनाला जाब विचारला असता मेल करा त्यानंतर पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील असे सांगितले जाते.

दिलीप डोळस (स्थानिक नागरिक) यांनी देखील नाराजीचा सूर आळवला. ते म्हणाले सोमाटणे टोल नाक्यावर सतत वाहनांची गर्दी असते. टोल नाक्यावर कुठल्याही पट्ट्या रंगवल्या गेल्या नाहीत. टोल पासून ठराविक अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा गेल्यास सर्व वाहने पैसे न घेता सोडून देण्याचा नियम आहे, असे असताना टोल प्रशासनाकडून नियम पाळला जात नाही.

मागील काही दिवसांपासून जुन्या पुणे मुंबई महामार्गावर असणाऱ्या सोमाटणे टोल नाक्यावर टोल आकारला जातो त्याबाबत स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी टोल प्रशासनाला लेखी निवेदन दिले. याबाबत टोल प्रशासनाने स्थानिक गाड्यांना टोल घेणार नसून याआधी कट झालेला टोल बाबत नागरिकांनी पुरावा देऊन ते पैसे परत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचप्रमाणे स्थानिक नागरिकांनी गाडीचे आरसी बुक व आधार कार्ड टोल प्रशासनाकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT