MP Naresh Mhaske addressing party workers at a Shiv Sena Shinde faction rally in Kalyan, emphasizing the importance of social media engagement. saam tv
मुंबई/पुणे

कॉकरोच जनता पार्टीने वाढवलं शिवसेनेचं टेन्शन? पक्षातल्या खासदारांनी मनातलं सांगितलं, बैठकीत काय चर्चा झाली?

Naresh Mhaske Statement On Social Media Followers In Kalyan: कल्याणमधील शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका करत कार्यकर्त्यांना पक्षाच्या सोशल मीडिया अकाउंटला फॉलो करण्याचे आवाहन केले.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

सोशल मीडियावर कॉकरोच पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्षाच्या वाढत्या फॉलोअर्सची सर्वत्र चर्चा सुरू असताना, त्यावरून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यातही राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. कल्याणजवळील कांबा परिसरात आयोजित मेळाव्यात बोलताना खासदार नरेश म्हस्के यांनी नाव न घेता विरोधकांवर निशाणा साधत आपल्या कार्यकर्त्यांनाच सवाल केला.

चार दिवसांत एखाद्याचे मिलियन फॉलोअर्स झाले, याची चर्चा आपण करतो. पण ते फॉलोअर्स वाढले कारण लोकांनी त्यांचे अकाउंट फॉलो केले, पोस्ट लाईक केल्या. मग आपल्या नेत्यांच्या आणि पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटला आपण कधी फॉलो करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनाही आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. येथील दहा टक्के लोकांनीसुद्धा शिंदे साहेब किंवा शिवसेना पक्षाचे अधिकृत अकाउंट फॉलो केले नसतील,असे म्हणत त्यांनी सोशल मीडियावरील सक्रियतेवर भर दिला.

राजकारणात सोशल मीडियाचे वाढते महत्त्व लक्षात घेता, कार्यकर्त्यांनी केवळ विरोधकांच्या फॉलोअर्सची चर्चा न करता आपल्या पक्षाची डिजिटल ताकद वाढवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. खासदार म्हस्के यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, कॉकरोच पक्ष या उल्लेखावरून आता नव्या राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : फडणवीसांनी मराठ्यांच्या लेकरांनाच टार्गेट का केलं? जरांगेंचा थेट हल्लाबोल

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; वनडेमध्ये शुभमन गिल, टी २० मध्ये वैभव सूर्यवंशीची जबरदस्त झेप

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

SCROLL FOR NEXT