Nala Sopara News Saam Digital
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : २५० कोटींचं हॉस्पिटल मंजूर...श्रेयवादावरून बहुजन विकास आघाडी-भाजप कार्यकर्ते भीडले; तुफान राडा, पाहा Video

BJP Nala Sopara News : नालासोपारा येथील आचोळे भागात नगरविकास खात्यातून मल्टिसपेशलिस्ट हॉस्पिटलसाठी २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याच्या श्रेयवादावरून आज बहुजन विकास आघाडी-भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

Sandeep Gawade

महेंद्र वानखेडे,वसई

वसई विरार महानगरपालिकेच्या नवीन सुसज्ज रुग्णालयाच्या भूमी पूजनाचा कार्यक्रम आज पार पडला. यावेळी बहुजन विकास आघाडी व भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते व भाजप कार्यकर्ते यांनी कार्यक्रमस्थळी गोंधळ घातला. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोधात घोषणाबाजी करत पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

एका ठराविक पक्षाच्या म्हणण्यानुसार पालिका प्रशासनाने भूमीपूजनाचा कार्यक्रम ठेवल्याचा आरोप यावेळी कऱण्यात आला . पालिका प्रशासना विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी आयुक्तांची गाडी अडवली होती.यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

नालासोपारा येथील आचोळे या भागात हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.नगरविकास खात्यातून २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.सोमवारी नगरविकास विभागाकडून परिपत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे रुग्णालय अत्याधुनिक असणार आहे. एकूण ४०० बेड असणार आहे.या रुग्णालयाचा वसई विरार मधील रुग्णांना चांगला फायदा होणार आहे.

या रुग्णालयासाठी कोणी प्रयत्न केले हे जनतेला माहीत आहे. हॉस्पिटल किती बेडचं, कसं झालं, प्लानिंग काय यांना माहिती तरी आहे का.? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पहिल्या टप्प्यातील २५ कोटी रूपयाचे पत्रक नालासोपारा विधानसभेचे आमदार क्षितिज ठाकूर यांना दिले. यावेळी त्यांनी क्षितिज यांना वाढदिवसाची भेट म्हणून दिली आहे. तर उद्याच क्षितिज यांच्या वाढदिवसानिमित्त नारळ फोडा, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले होते. त्यामुळे विरोधात राजकारण करत आहे करू द्या.आम्हाला पण हा भूमिपूजन सोहळा मोठा कार्यक्रम घेऊन करायचा होता पण मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून भूमिपूजन सोहळा पार पडला आहे, अशी प्रतिक्रिया वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT