Pune GBS Freepik
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात वाढत्या GBSच्या प्रभावाला रोखण्यासाठी महापालिका सज्ज, जलशुद्धीकरण मोहीम सुरू

Pune GBS: पुणे शहर आणि ग्रामीण भागात गुलेन बॅरे सिंड्रोमचे आणखी दोन रुग्ण आढळले असून, त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २१५ वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

Dhanshri Shintre

पुणे शहर आणि ग्रामीण भागात गुलेन बॅरे सिंड्रोमचे (GBS) आणखी दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण GBS रुग्णसंख्या २१५ वर पोहोचली आहे. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात ४३ रुग्ण, तर समाविष्ट गावांमध्ये सर्वाधिक ९५ रुग्ण सापडले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत 32, पुणे ग्रामीणमध्ये 33 आणि इतर जिल्ह्यांतील 12 रुग्ण आहेत.

सध्या 32 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत असून 18 जण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. काल दिवसभरात एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून, आतापर्यंत एकूण 153 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, या आजारामुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

जीबीएसची स्थिती

वय – एकूण रुग्णसंख्या

० ते ९ – २४

१० ते १९ – २६

२० ते २९ – ४५

३० ते ३९ – २७

४० ते ४९ – ३०

५० ते ५९ – ३२

६० ते ६९- २१

७० ते ७९ – 

८० ते ८९ – 

पुणे शहरात वाढत्या गुलेन बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दहा दिवसांत महापालिकेने २५ टाक्यांची स्वच्छता पूर्ण केली असून, उर्वरित टाक्यांची स्वच्छता पुढील काही दिवसांत पूर्ण केली जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

पुण्यातील सिंहगड रस्ता, खडकवासला, नांदोशी, नांदेड आणि किरकिटवाडी या भागांत GBS संशयित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना म्हणून जलस्वच्छतेवर भर देण्याचा निर्णय घेतला. शहरात सुमारे १५५ पाण्याच्या टाक्या असून, त्या महिनाभरात स्वच्छ करण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

या टाक्यांमधून शहराच्या विविध भागांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद ठेवून स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. नागरिकांनी या प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जलस्वच्छतेच्या या मोहिमेमुळे GBS संसर्ग कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT