Action On Dargah: दर्ग्याच्या जागेवर मंदिर उभारणार? दर्ग्यावर कारवाई, नाशिकमध्ये तणाव

Nashik News: नाशिकमध्ये अनधिकृत दर्ग्याचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. या प्रकरणामागचे नेमके कारण काय आहे? दोन गट एकमेकांसमोर का उभे ठाकले? वादाच्या मुळाशी काय आहे?
Nashik News
Nashik Newssaam tv
Published On

आता बातमी आहे नाशिकमधील तणावाची. नाशिकमध्ये अनधिकृत दर्ग्याचा मुद्दा पुन्हा तापला आहे. मात्र हे अनधिकृत दर्ग्याचं प्रकरण काय आहे? दोन गट आमने-सामने का आले होते? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट पाहा.

राज्यात पुन्हा एकदा लँड जिहादचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नाशिकच्या द्वारका परिसरातील काठे गल्ली परिसरातील अनधिकृत दर्गा हटवण्यासाठी नाशिक महापालिकेने कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात केली आणि नाशिकमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर कारवाई होईपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या साधू आणि महंतांची धरपकड करण्यात आली आहे. अनिकेत शास्त्री आणि भाजप आमदार देवयानी फरांदे यांनीही कारवाईसाठी ठिय्या मांडला.

Nashik News
Kolhapur: 600 किलो वजनाचा गवा पडला विहिरीत, नागरिकांची मोठी गर्दी

दुसरीकडे प्रशासनाने दिलेले जमावबंदीचे आदेश धुडकावून मुस्लिम संघटनांनी दर्ग्यासमोरच ठिय्या मांडला. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. मात्र हे अनधिकृत दर्ग्याचं प्रकरण काय आहे? ते पाहूयात.

अनधिकृत दर्ग्याचं प्रकरण काय?

नाशिकच्या काठे गल्लीत 25 वर्षापूर्वी दर्ग्याची उभारणी

दर्गा अनधिकृत असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप

दर्गा हटवण्याबाबत हिंदूत्ववादी संघटनांचा आंदोलनाचा इशारा

दर्ग्यावर कारवाई न झाल्यास दर्ग्यासमोर मूर्ती प्रतिष्ठापना करण्याची घोषणा

तर मुस्लीम धर्मगुरुंनी मात्र शांततेचं आवाहन केलं आहे.

Nashik News
GBS: नागपूरात जीबीएसचा तिसरा बळी, ३२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू, राज्यातील मृतांचा आकडा १२ वर

हिंदूत्ववादी संघटनांच्या रेट्यानंतर महापालिकेने कडेकोट पोलीस बंदोबस्तात 6 तासानंतर अनधिकृत दर्ग्याविरोधातील कारवाई पूर्ण केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता पालिकेची अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधातील कारवाई थंडावणार की आणखी जोर पकडून अनधिकृत धार्मिक स्थळांवर बुलडोजर चालवणार? याकडे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com