Nupur Sharma Saam Tv
मुंबई/पुणे

नुपूर शर्मांच्या अडचणीत वाढ; मुंब्रा पोलिसांचे समन्स

२२ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या (BJP) निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंब्रा पोलिसांनी त्यांना समन्स बजावले आहे. २२ जून रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून त्यांना भारतीय जनता पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

नुपूर शर्मा यांच्या विरुद्ध मुंबईतील पायधुनी, ठाणे शहरातील मुंब्रा, पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. नुपूर शर्मा आणि त्यांच्या कुटुंबियांना दिल्ली पोलिसांनी सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. शर्मा यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या संबंधी त्यांनी दिल्ली पोलिसांत (Police) अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावर भारतासह आखाती देशांकडूनदेखील तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान नुपूर शर्मा यांना मुंब्रा पोलिसांनी २२ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT