बेंगळुरू : घराघरातून 'चड्डया' गोळा करत कॉंग्रेस कार्यालयात पाठवल्या; RSS चं अजब आंदोलन

RSS workers Sends Underwear to The Congress Office in Karnataka: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि भगवीकरणाचा निषेध म्हणून 'चड्डी' जाळण्यात येईल, असे काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी म्हटले होते.
RSS workers in Karnataka have collected Underwear and sends to the Congress office
RSS workers in Karnataka have collected Underwear and sends to the Congress officeTwitter/@ANI

बंगळुरू : कर्नाटक राज्यामध्ये कॉंग्रेस (Congress) आणि आरएसएस (RSS) या दोघांमधला वाद उफाळून वर आला आहे. कर्नाटकचे (Karnataka) माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नते सिद्धरामय्या यांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएस (RSS) च्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकमधील कॉंग्रेस कार्यालयात चड्ड्यांनी (अंतर्वस्त्रांनी) भरलेले बॉक्स पाठवायला सुरुवात केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि भगवीकरणाचा निषेध म्हणून 'चड्डी' जाळण्यात येईल, असे काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी म्हटले होते. सिद्धरामय्या यांच्या आरएसएसविरोधातील वक्तव्याचा भाजपच्या अनेक नेत्यांनी निषेध केला आहे. भाजपचे सरचिटणीस सीटी रवी यांनी कार्यकर्त्यांना सिद्धरामय्या यांच्या विरोधात आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आरएसएस कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस कार्यालयात चड्ड्या पाठवायला सुरुवात केली आहे. (RSS workers in Karnataka have collected Underwear and sends to the Congress office)

हे देखील पाहा -

नेमकं काय आहे प्रकरण?

गेल्या आठवड्यात, एनएसयूआयच्या काही सदस्यांनी, काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेने राज्याचे शिक्षण मंत्री बीसी नागेश यांच्या निवासस्थानाबाहेर खाकी शॉर्ट्सची (चड्ड्यांचाी) जोडी जाळली. राज्यातील शालेय पाठ्यपुस्तकांच्या कथित भगवीकरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. यानंतर रविवारी कर्नाटकातील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी एनएसयूआयच्या सदस्यांनी पोलिसांसमोर चड्ड्या जाळल्याचे सांगत आरएसएसची खिल्ली उडवली होती. त्यामुळे आता आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निषेधार्थ ठिकठिकाणी चड्डी जाळणार आहोत असं ते म्हणाले होते. तसेच आरएसएस ही धर्मनिरपेक्ष संघटना नाही हे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलो आहे. दलित, ओबीसी किंवा अल्पसंख्याक समाजातील कोणी सरसंघचालक झाला आहे का? असा सवालही सिद्धरामय्या यांनी केला उपस्थित केला होता. यालाच आरएसएसकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

RSS workers in Karnataka have collected Underwear and sends to the Congress office
Rajya Sabha Election: महाविकास आघाडीनं बोलावली ट्रायडेंटमध्ये बैठक, २०१९ सालचं कनेक्शन...?

कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यातील (Mandya District) केआर पेटमधील RSS कार्यकर्त्यांनी सिद्धरामय्यांच्या राज्यभर खाकी चड्डी जाळण्याच्या आवाहनाचा निषेध करत खाकी चड्ड्यांचं पार्सल सिद्धरामय्या यांना पाठवलं आहे. आरएसएस कार्यकर्त्यांनी दावा केला आहे की, विरोधी पक्षनेत्यांना आम्ही इतक्या चड्ड्या पाठवू, की ते कधीच जाळू शकणार नाहीत. दरम्यान, कार्यकर्त्यांनी गावोगावी-घरोघरी जाऊन चड्ड्या गोळा करण्याचं काम सुरु केलंय. सध्या शेकडो चड्ड्या एका बॉक्समध्ये पॅक करून बंगळुरू काँग्रेस कार्यालयात पाठवण्यात आल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com