Rajya Sabha Election: महाविकास आघाडीनं बोलावली ट्रायडेंटमध्ये बैठक, २०१९ सालचं कनेक्शन...?

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Rajya Sabha Elections 2022 News, Mahavikas Aghadi Latest News
Rajya Sabha Elections 2022 News, Mahavikas Aghadi Latest NewsSAAM TV
Published On

मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्ष 'अॅलर्ट' मोडवर आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. आमदारांची मते फुटू नयेत यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपनेही आपापल्या आमदारांना मुंबईत बोलावलं आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीने सर्व आमदारांसह इतर काही अपक्ष आमदारांची आज, मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलात बैठक बोलावली आहे. महाविकास आघाडीचा हा 'महाप्लान' यशस्वी ठरणार का? २०१९ मधील पुनरावृत्ती होणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. (Rajya Sabha Elections 2022)

राज्यसभा निवडणुकीमुळं राज्यातील वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपनेही अपक्ष आमदारांची मते मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. आम्हीच जिंकणार असा दावा दोन्ही बाजूंकडून केला जात आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीचाही 'महाप्लान' आहे. त्यानुसार, महाविकास आघाडीनं आज संध्याकाळी रणनीती ठरवण्यासाठी ट्रायडेंट हॉटेलमध्ये सर्व आमदारांसह काही अपक्ष आमदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर नेते या बैठकीत सहभागी होतील. तसेच उपस्थित आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. (Mahavikas Aghadi Latest News)

२०१९ ची पुनरावृत्ती होणार?

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज, संध्याकाळी मुंबईत ट्रायडेंट हॉटेलमध्ये सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी ही बैठक बोलावली आहे.

महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे एच. के. पाटील, नाना पटोले आदी नेते आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. ही बैठक बोलावण्यामागे एक विशेष कारण असल्याचे बोलले जाते.

२०१९ साली राज्याच्या सत्तास्थापनेवेळी अशीच एक बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी बैठकीद्वारे जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आली होती. आमच्याकडे स्पष्ट बहूमत असल्याचे महाविकास आघाडीने भाजपला त्यावेळी दाखवून दिले होते. या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कमालीचा आत्मविश्वास निर्माण करण्यात आला होता. तसेच महाविकास आघाडीचे आमदार फुटण्याचा धोकाही टळला होता. आता पुन्हा राज्यसभेसाठी हीच रणनीती अवलंबली जात आहे.

शिवसेना आमदारांना २ दिवस ट्रायडेंटमध्येच ठेवणार?

शिवसेना आमदारांना आज, मंगळवारी दुपारी ट्रायडेंट हॉटेलला आणण्यात येणार आहे. महाविकास आघाडीची संध्याकाळी बैठक होणार आहे. या बैठकीनंतर आमदारांना याच हॉटेलमध्ये पुढील दोन दिवस ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच काही अपक्ष आमदारांनाही याच ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.

आमदारांची पुन्हा हॉटेलवारी!

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आमदारांची 'हॉटेलवारी' सुरू झाल्याचे दिसून येते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पवई येथील वेस्टिन हॉटेलमध्ये राहणार असल्याचे कळते, तर शिवसेनेचे आमदार ट्रायडेंट हॉटेलमध्ये राहणार असल्याची चर्चा आहे.

भाजप (BJP) आमदारांना ताज हॉटेलात ठेवणार आहेत. राज्यसभा निवडणुकीपर्यंत हे सर्व पक्षांचे आमदार मुंबईतील हॉटेलांमध्ये वास्तव्यास असणार आहेत. मतदानाच्या दिवशी ते थेट विधान भवनात पोहोचतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com