मुंबई: बारावीचा (HSC) निकाल तीन दिवसात लागणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. उद्या ८ जून रोजी बारावीचा निकाल लागणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. उद्या दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे. गायकवाड यांनी ट्विट करुन विद्यार्थ्यांना निकालासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान बारावीचा निकाल उद्या म्हणजेच बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील. या परीक्षेस १४,८५,१९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,१७,१८८ मुलं असून मुलींची संख्या ६,६८,००३ एवढी आहे. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा, अस ट्विट मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.