Landslide On Mumbra bypas
Landslide On Mumbra bypas Saam tv
मुंबई/पुणे

Landslide On Mumbra bypass: मुंब्रा बायपास रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली; वाहतुकीवर परिणाम

कल्पेश गोरडे

Thane News: गेल्या काही तासांपासून मुंबईसह ठाण्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. ठाणे जिल्ह्यातील काही भागातही पावसाची संततधार सुरू आहे. कालपासून सुरू असलेल्या या पावसामुळे मंगळवारी पहाटे मुंब्रा बायपास रस्त्यावर दरड कोसळली. त्यानंतर आज पुन्हा या बासपास रस्त्यावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील मुंब्रा परिसरातील मुंब्रा बायपास येथील दुसऱ्यांदा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. ४ दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली. सलग दुसऱ्या दिवशी मुंब्रा बायपास येथील खडी मशीन रोडजवळ पुन्हा एकदा दरड कोसळली आहे.

बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी किंवा दुखापत झाली. तसेच दरड ठाण्याच्या येणाऱ्या मार्गावर आली आहे. त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे

काल पहाटेच्या सुमारास देखील मुंब्रा बायपास येथील हनुमान मंदिर जवळ अशाच प्रकारे दरड कोसळली होती. त्यानंतर आज दरड कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक विभागाचे कर्मचारी, मुंब्रा प्रभाग समिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१-पिकअप वाहन, अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह उपस्थित झाले आहेत. रस्त्यावर आलेल्या दरड चा मलबा काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

आंबेनळी घाटात दरड कोसळली

रायगडमधील आंबेनळी घाटातही आज दरड कोसळली. मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी दरड कोसळल्याने पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. संबंधित यंत्रणांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही वाहतूक पूर्ववत झाली. पण त्यानंतर पुन्हा एक किलोमीटरवर दरड कोसळली आहे. डोंगरावरील मातीचा ढिगारा थेट रस्त्यालगत आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nigeria Bomb Blast: प्रॉपर्टीच्या वादातून प्रार्थनास्थळात बॉम्बस्फोट; ८ जणांचा मृत्यू, १६ जखमी

Mumbai Lok Sabha: मुंबईत आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; शिवाजी पार्कवर PM मोदी अन् राज ठाकरे, तर बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

Daily Horoscope: कष्टाला पर्याय नाही, 'या' ३ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार; तुमच्या राशीत काय?

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

SCROLL FOR NEXT