Mumbai Rain Update: मुंबईसह ठाण्यात पावसाची तुफान बँटिग; लोकल ट्रेनचा वेग मंदावला

Mumbai Rain Update: मुसळधार पावसामुळे ठाणे रेल्वे स्टेशनजवळील ट्रॅकवर पाणी साचलं आहे. या जोरदार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसण्याची शक्यता आहे.
Mumbai Rain Update
Mumbai Rain UpdateSaam tv
Published On

Mumbai rain update News: मुंबईसह नजीकच्या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह ठाणे,डोंबिवली भागातही पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे ठाणे रेल्वे स्टेशनजवळील ट्रॅकवर पाणी साचलं आहे. या जोरदार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसण्याची शक्यता आहे. पावसाच्या या नॉन-स्टॉप बॅटिगमुळे मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेनचा वेग मंदावला आहे. (Latest Marathi News)

मुंबईसह आजूबाजूच्या शहरात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे त्याचा फटका मध्य रेल्वेला बसण्याची शक्यता आहे. जोरदार पावसामुळे मध्य मार्गावरील लोकल ट्रेन 15 मिनिटे उशिराने धावत आहे.

Mumbai Rain Update
Mumbai Rain Update: मुंबईची झाली तुंबई; शहरात पावसाचा जोर वाढला, पुढील तीन-चार तास महत्वाचे

पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास त्याचा फटका संध्याकाळच्या सुमारास चाकरमान्यांना बसू शकतो. मागील तासाभरात ठाण्यात 40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मागील 5 तासात 110 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळ जमीन खचली

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पाऊस कोसळत आहे. यामुळे जमीन भुसभुशीत झाली आहे. या पावसामुळे बोरिवली पूर्व भागातील मागाठाणे मेट्रो स्थानाकाशेजारील खाजगी जागेवर खोदकाम सुरू असताना जमीन खचल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी सदर ठिकाणी काम करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देखील देण्यात आली आहे.

जमीन खचल्यामुळे मागाठाणे मेट्रो स्थानकाचा एक भाग आणि महापालिकेचा रस्ता नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. पाऊस जर असाच पडत राहिला आणि जमीन खचत राहिली तर मेट्रो स्थानकाला देखील याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Mumbai Rain Update
Ambenali Ghat Landslide : सावधान! आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली; नवी मुंबईतही मोठी दुर्घटना

कल्याण-डोंबिवलीचा पावसाचा जोर कायम

कल्याण डोंबिवलीत पावसाचा जोर कायम आहे. कल्याण आडीवली ढोकळी परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं आहे. शाळेमध्ये देखील पाणी शिरलं आहे. वाहन चालक शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल झाले आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे.

डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यातही पाणी शिरले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी भरलं आहे. याचबरोबरमध्ये डोंबिवलीमध्येही काही दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com