Mumbai Rain Update: मुंबईची झाली तुंबई; शहरात पावसाचा जोर वाढला, पुढील तीन-चार तास महत्वाचे

मुंबईसह कोकणातही पारवसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. जोरदार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.
Mumbai Rain Update
Mumbai Rain UpdateSaam tv
Published On

Mumbai News: मुंबईसह नजीकच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह कोकणातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. जोरदार पावसामुळे शहरातील काही ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबईत गेल्या तीन तासांपासून जोरदार पाऊस झाला आहे. पुढील तीन-चार तासांतही मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

काल हवामान विभागाने ४८ तासांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार मुबंई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीसहित अन्य भागात पाऊस कोसळत आहे.

Mumbai Rain Update
Mumbai Traffic Jam: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, रस्त्यावर ट्राफिक जाम तर रेल्वे वाहतूक उशिराने; ऑफिसला जाणाऱ्यांचे हाल

मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पुढील दोन दिवसांत पावसाने सर्व महाराष्ट्र व्यापला आहे. हवामान विभागाने पालघर आणि रायगड जिल्ह्याला आज, बुधवारी 'ऑरेंज अ‍ॅलर्ट' दिला आहे. पुण्यासह अन्य काही जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे.

मुंबईत जोरदार पावासाला सुरुवात झाली आहे. जोरदार पावसामुळे मुंबई महापालिकेने नागिरकांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई महापालिकेने ट्विट करत नागरिकांना भरती-ओहोटीची माहिती दिली आहे.

'मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वररूपाचा पाऊस व काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्याता आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे. तसेच पालिकने भरती-ओहोटीची वेळ देखील दिली आहे.

ठाण्यात मुसळधार पाऊस

ठाण्यातही मुसळधार पावासाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून सुरू असणाऱ्या पावसाचा फटका बसला आहे. जोरदार पावसामुळे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या वंदना सिनेमा आणि चरई या ठिकाणी बसला आहे. वंदना सिनेमा या ठिकाणी दोन फुटापर्यंत सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना तसेच वाहन धारकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे.

Mumbai Rain Update
Raj Thackeray News : पुण्यातील तरुणीवरील जीवघेण्या हल्ल्यानंतर राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना, प्रशासनाचेही कान टोचले

पालघर जिल्ह्यात पावसाची संततधार

पालघर जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार पाऊस सुरू आहे. आज सकाळपासून पालघर जिल्ह्यात पावसाने दमदार अशी हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पालघरच्या पश्चिम किनारपट्टी भागासह पूर्वपट्ट्यांमध्ये दमदार असे हजेरी लावल्याने खोळंबलेल्या भात पेरण्याना सुरुवात झाल्याने बळीराजांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com