Raj Thackeray News : पुण्यातील तरुणीवरील जीवघेण्या हल्ल्यानंतर राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना, प्रशासनाचेही कान टोचले

Raj Thackeray on Pune Girl Attack : राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांनाही अशा घटना घडताना दिसल्यास वेळेत धावून जा, अशा सूचना केल्या आहेत.
Raj Thackeray News
Raj Thackeray NewsSaam TV
Published On

Mumbai News : पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने झालेल्या जीवघेण्या हल्ल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तरुणीवर हल्ला झाल्यानंतर आपल्या जीवाची पर्वा न करता मदतीला धावलेल्या लेशपाल जवळगेचं देखील राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे.

वाढत्या गुन्हेगारीवर बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी. तसेच राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांनाही अशा घटना घडताना दिसल्यास वेळेत धावून जा, अशा सूचना केल्या आहेत.  (Latest Marathi News)

Raj Thackeray News
Attacked on Girl in Pune : कोयत्याने वार होत असतानाही मैत्रिणीसाठी 'तो' ढाल बनला, आभार मानताना पीडितेच्या आईला अश्रू अनावर

राज ठाकरेंनी काय म्हटलं?

काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं.

अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं. दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे.  (Crime News)

Raj Thackeray News
Pune News : लग्न करण्यास नकार दिल्याने महिलेकडून तरुणाचे अपहरण, पुणे पोलिसांकडून तिघांना अटक

सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी. आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com